

अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील अजिठा येथील अंधारी मध्यम प्रकल्पातील जलसाठा १६ टक्केच शिल्लक असून प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्यावर परिसरातील अजिंठा, शिवणा, अमसरी, मादणी, वाघेरा असे पाच गावांच्या पाणीपुरवठा अवंलबुन आहे . त्यातच अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पकल्पातील पाणीसाठ झपाट्याने कमी झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता असून नागरिक धरण भरण्याची प्रतीक्षा करीत आहे . सध्या पाऊस सुरू आहे .परंतु पावसाचा जोर कायम नसल्याने नद्या नाल्यांना अद्याप पूर देखील आलेला नाही. हा प्रकल्प दरवर्षी शंभर टक्के भरुन ओसंडून वाहत असतो. मात्र यावर्षीच्या तहान भागावणारा प्रकल्पात पाणीसाठा देखील चिंता वाढवणारा ठरत आहे . कारण, गेल्या वर्षी अगस्ट मध्ये प्रकल्पात ६० . ३० टक्के पाणी साठा होता . यंदा हाच पाणीसाठा १६ टक्के आहे . त्यामुळे आगामी काळत जोरदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.