नांदेड : ब्राम्हणगांव येथे चोरट्यांचा धुडगूस; एका रात्रीत चार घरफोड्या

नांदेड : ब्राम्हणगांव येथे चोरट्यांचा धुडगूस; एका रात्रीत चार घरफोड्या
Published on
Updated on

उमरखेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे चोरट्यांनी तीन घरे फोडून तसेच बियर बारचे सीसीटीव्ही चोरून २३ हजाराच्या मुद्देमालासह पसार झाल्याची घटना रविवारी (दि १०) मध्यरात्री घडली. चोरट्यांनी दगड मारून एकाला जखमी केले. तसेच धारदार शस्त्रांनी वार केल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चार ते पाच दिवसांपूर्वीच तालुक्यातील सोईट (म) व सावळेश्वर येथे चाेरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला हाेता.  रविवारी मध्‍यरात्री उमरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ब्राम्हणगांव येथे चोरट्यांनी शुभम बारमधील दोन सीसीटीव्ही कॅमेरे चाोरले. यानंतर आसपासच्या घरांची दरवाजे बाहेरून बंद केले. गंगाधर लांडगे यांच्या घरात चॅनल गेटचे कुलूप तोडून प्रवेश केला. लांडगे यांच्‍या मुलीच्या पर्समधील 2200 रुपयांवर डल्‍ला मारला. यावेळी मुलीला जाग आली. तिने  आरडाओरडा केला. घरातील सदस्य जागे झाले. लांडगे यांच्या मुलाने चाेरट्यांना अटकाव करण्‍याचा प्रयत्‍न केला.  डाव्या डोळ्यावर दगड मारुन  चाेरट्यांनी त्‍याला जखमी केले. तसेच चाकूही फेकून मारला. सुदैवाने तो लागला नाही.  पर्समधील 2200 रुपये घेऊन अंगणात बॅगा फेकून चाेरटे पसार झाले.

यानंतर चाेरट्यांनी संतोष तुळशीराम वाठोरे यांच्या घरात प्रवेश केला.  ९ हजार रुपयांची राेकड व वाठाेरे यांच्‍या पत्‍नीचे अडीच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पाेबारा केला. विश्वनाथ तुकाराम कनकापूरे यांचे घरी धुडगूस घातला. त्‍यांचे  शेजारी अरविंद धबडगे यांनी आरडाओरड केला. सात ते आठ जणांनी कनकापूरे यांच्‍या घरी धाव घेतली. हे पाहून चोरट्यांनी पळ काढला. मागील वर्षीही लांडगे व वाठोरे यांच्या घरी चोरी झाली होती. या घटनेची  नाेंद उमरखेड पोलीस ठाण्‍यात झाली आहे.  तपास अमोल माळवे करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news