नांदेड : ‘बाभळी’चे पाणी तेलंगणात; शेतीक्षेत्राला लाभ नसल्याने नाराजी | पुढारी

नांदेड : ‘बाभळी’चे पाणी तेलंगणात; शेतीक्षेत्राला लाभ नसल्याने नाराजी

धर्माबाद, पुढारी वृत्तसेवा : तेलंगणा व महाराष्ट्र या दोन राज्यांत राजकीय संघर्षानंतर पूर्णत्वास आलेल्या बाभळी बंधार्‍याचे सर्व दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रवारी ( दि.1) उघडण्यात आले. त्यामुळे बंधार्‍याच्या पात्रातील शिल्लक जलसाठा पोचमपाड (श्रीराम सागर) धरणात सोडण्यात आला.

यावेळी केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता एस. श्रीनिवासराव, पोचमपाड धरणाचे अभियंता एन. व्यंकटेश्वरलू, जलसंपदा विभागाचे
कार्यकारी अभियंता एन.पी. गव्हाणे आदी उपस्थित होते. बंधारा पूर्ण होऊन नऊ वर्षे उलटली तरी, राजकीय उदासीनतेमुळे या पाण्याचा सदुपयोग झालाच नाही, त्यामुळे दरवर्षी दारे लावा पाणी अडवा, गरजेच्या वेळी शेजारी राज्यास पाणी सोडा एवढीच औपचारिकता पार पाडली जाते. त्यामुळे सुमारे 200 कोटींचा खर्च होऊन इंचभरही क्षेत्र ओलिताखाली येऊ शकले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 29 ऑक्टोबर 2013 साली बाभळी बंधार्‍याचा लोकार्पण सोहळा मोठया थाटामटात पार पडला होता, यावेळी हा भाग एक वर्षात सिंचनाखाली येईल, असे आश् वाासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे अद्याप या पाण्याचा शेतीसाठी विनियोग होऊ शकला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 1 जुलै रोजी बाभळी बंधार्‍याचे सर्व चौदा दारे वर उचलली जातात व त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी बंद केली जातात.

Back to top button