सावधान! दिवाळीपूर्वीच भेसळीचा धंदा तेजीत; गेवराईमध्ये सुट्टे पामतेलाची विक्री करणाऱ्यावर कारवाई

भेसळ
भेसळ

बीड, पुढारी वृत्तसेवा : गेवराई मोंढा येथील एका किराणा दुकानात सुट्टे पामतेलाची विक्री होत असल्याची माहिती अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांना मिळाली. यानंतर त्यांनी शहरातील मोंढा भागात किराणा दुकानात धाड टाकली. येथील मोंढा भागात (दि.१४) शुक्रवारी सायंकाळी ८च्या सुमारास सुट्टे पामतेलाची विक्री करणाऱ्या किराणा दुकानावर अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली.

या कारवाईमध्ये सुट्टे पाम तेल १५०० कि.ग्रॅ. व सोयबिन तेल ५०० कि.ग्रॅ. जप्त केले असून यामध्ये २ लाख ३२ हजार ५०० रुपयाचे तेल जप्त करून तपासणीसाठी पाठवण्यात आले, असल्याची माहिती सय्यद इम्रान हाश्मी यांनी दिली. सदरची कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड, नमुना साहय्यक उमेश कांबळे, भास्कर घोडके आदींनी केली.

दिपावली निमित्त मोठ्या प्रमाणात तेलाचे विक्री केली जाते. परंतू सुट्टे तेल विक्री न करण्याचे आदेश असताना देखील जास्त पैसै व तेलात भेसळ करण्याच्या लालसेने दुकानदार सुट्टे तेल विक्री करतात. नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता सरास सुट्टे तेल विक्री केले जाते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news