महिलेस जातिवाचक शिवीगाळ करीत पतीस मारहाण, गुन्हा दाखल

दोघा बापलेकांविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
Beed Crime News |
महिलेस जातिवाचक शिवीगाळ करीत पतीस मारहाण, गुन्हा दाखल File Photo
Published on
Updated on

Woman abused in casteist language and beat up husband

गौतम बचुटे/केज

घरा समोर उभ्या केलेल्या ट्रॅक्टरने ऊस वाहतुकीची छकडीही घेऊन जाताना अडवल्या वरून महिलेस जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी बाप लेकांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime News |
Beed Crime | ऊसतोडीसाठी दिलेल्या पैशांवरून वाद: केज येथे माय-लेकींवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

या विषयी अधिक माहिती अशी की, केळगाव ता. केज येथील सुशीला तुकाराम दुनघव ही महिला घरी असताना ११ एप्रिल दुपारी ४:०० वाजता त्यांच्या गावातील ऊसतोड मुकादम उत्तरेश्वर रामभाऊ घुले व त्यांचा मुलगा विष्णू उत्तरेश्वर घुले हे दोघे बाप-लेक ट्रॅक्टरचे हेड घेऊन आले.

त्यांनी या महिलेच्या घरा समोर ट्रॅक्टरने ओढून ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेली छकडी ही त्यांनी सोबत आणलेल्या ट्रॅक्टरच्या हेडला जोडली. आणि घेऊन जाउ लागले. हे पाहिल्याने सुशीला दुनाघव यांनी छकडी घेऊन का जात आहात? अशी विचारणा केली असता त्या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून छकडी घेऊन गेले.

Beed Crime News |
Beed Crime News : सैनिकाच्या वडिलांना मारहाण, एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

दुसऱ्या दिवशी महिलेचे पती तुकाराम दुनघव व मुलगा अजय दुनघव हे इतर दोघांना घेऊन मुकादम उत्तरेश्वर घुले यांच्याकडे जाऊन छकडी परत द्या, असे म्हणाले असता तुकाराम दुनघव यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण केली.

तुम्हाला काय करायचे ते करा, म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार सुशीला दुनघव या महिलेने दिल्यावरून ऊसतोड मुकादम उत्तरेश्वर घुले व विष्णू उत्तरेश्वर घुले या दोघा बापलेकां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news