Beed Crime News : सैनिकाच्या वडिलांना मारहाण, एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

या घटनेत मारहाण करणाऱ्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Beed Crime News
Beed Crime News : सैनिकाच्या वडिलांना मारहाण, एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखलFile Photo
Published on
Updated on

A case has been registered against a person for assaulting a soldier's father.

गौतम बचुटे/केज :-

शेतजमीन मोजणीच्या कारणावरून देशाची सेवा करीत आलेल्या एका संरक्षण सेवेतील सैनिकाच्या वडीलांस दुचाकीवर बसवून नेऊन त्यांना दगड व लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना चिंचोली माळी ता. केज येथे घडली.

Beed Crime News
Beed Crime News | एकटी असल्याचा फायदा घेत विवाहितेचा छळ; राज्य महिला आयोगाच्या दखलींनंतर केजमध्ये ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

चिंचोली माळी ता. केज येथील शकरगंज बन्सी पठाण वय (५५ वर्ष) हे पत्नीसह गावात वास्तव्यास असून त्यांचा मुलगा भारतीय सैन्य दलात आहे. १७ एप्रिल रोजी सकाळी ८:०० वाजता ते पत्नी रुकसाना हिच्यासह गावाच्या वेशीत उभे राहिले होते.

यावेळी त्यांच्या शेताजवळून जाताना साहेबा गणपती बोर्डे हे त्यांच्याकडे दुचाकीवरून आले. बोर्डे यांनी शकरगंज यांना दुचाकीवर बसवून शाळेजवळ नेले. तेथे दुचाकी वरून उतरून त्यांना शेतजमीन मोजणीच्या कारण काढून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरू केली. इतक्यावरच न थांबता त्‍यांना दगडाने मारहाण केली. तसेच मुक्कामार दिला.

Beed Crime News
Kej Theft | केज बसस्थानकावर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण चोरणाऱ्या महिलेला अटक

यावेळी त्‍यांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देऊन तो निघून गेला. अशी तक्रार शकरगंज पठाण यांनी दिली. या तक्रारीवरून साहेबा बोर्डे विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news