Vilas Ghule Case | विलास घुले मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडे यांच्या निष्पक्ष तपासाच्या सूचना, आंदोलकांशी दूरध्वनीवरून संवाद

पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांना दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश
Parli Vilas Ghule Death Case
Parli Vilas Ghule Death Case Pudhari
Published on
Updated on

Parli Vilas Ghule Death Case

परळी वैजनाथ : केज तालुक्यातील टाकळी-कदमवाडी परिसरात घडलेल्या विलास घुले या तरुणाच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांना दिल्या आहेत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी सविस्तर चर्चा करून तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली. तसेच केज येथे ठिय्या आंदोलन करत असलेल्या आंदोलकांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

Parli Vilas Ghule Death Case
Beed News | जिल्हा परिषद शाळाच सकाळी, खासगी शाळांना सूट का?; शिक्षण विभागाच्या आदेशावर पालकांचा सवाल

या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना ना. मुंडे म्हणाल्या की, “माझ्या माहितीनुसार भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला मारहाण होऊन त्याचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना आहे. विलास घुले यांचा या वादाशी थेट संबंध नसताना त्यांना जीव गमवावा लागला, ही बाब अत्यंत अस्वस्थ करणारी आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “या संदर्भात मी पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून, संपूर्ण घटनेचा निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.”

Parli Vilas Ghule Death Case
Beed news | मुळुकवाडीत मध्यरात्री धाडसी चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

मृत विलास घुले यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनावर विश्वास ठेवून तपासात सहकार्य करावे तसेच अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले. “या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशीही चर्चा करणार आहे,” असे ना. पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news