Beed news | मुळुकवाडीत मध्यरात्री धाडसी चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

घर फोडून ३ तोळे सोने व खतासाठी ठेवलेली ५० हजारांची रोकड चोरट्यांनी केली लंपास
burglary
burglaryAI Image
Published on
Updated on

नेकनुर : बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे मध्यरात्री चोरट्यांनी घर फोडून सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

मुळुकवाडी येथील संदिप अंबादास ढास हे गाय आजारी असल्याने रात्री शेतात मुक्कामी होते. दरम्यान मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास द्वारकाबाई ढास यांना शेजारील खोलीत आवाज आल्याने जाग आली. त्यांनी घराच्या गच्चीवर झोपलेल्या प्रतिक्षा ढास यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी फोनवरून शेतात असलेल्या संदिप ढास यांना चोरीची माहिती दिली.

burglary
Haralwadi Theft Case | मोहोळ तालुक्यातील हराळवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ! अज्ञात चोरट्यांनी पाच घरांमधून लाखोंचा ऐवज चोरी

संदिप ढास यांनी तातडीने घरी येऊन पाहणी केली असता घरातील दोन्ही कपाटे फोडलेल्या अवस्थेत आढळून आली. कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते तसेच सोन्याचे दागिने ठेवण्याच्या डब्या उघड्यावर पडलेल्या दिसून आल्या. घरातील ३ तोळे सोने आणि खत खरेदीसाठी ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले.

burglary
Beed Crime News : केजमध्ये दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटले; पोलिसांनी अवघ्या ४ तासांत दोघांना केले जेरबंद

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नेकनुर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे व लिंबागणेश पोलीस स्टेशनचे राठोड यांना फोटो व व्हिडिओ पाठवून घटनेची माहिती दिली. चोरट्यांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news