Kej Storm damage | केज तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळाचा हाहाकार : पपई - केळीच्या बागा भुईसपाट !

वाऱ्यामुळे वीज कोसळून उन्मळून पडलेल्या झाडाखाली एकाचा मृत्यू
Kej Storm damage |  केज तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळाचा हाहाकार : पपई - केळीच्या बागा भुईसपाट !
वादळामुळे केळी बागांचे झालेले नुकसान, विज पडून मृत्‍यू झालेले दिगंबर ससाणे
Published on
Updated on

केज : शनिवार २३ मे रोजी सायंकाळी ६:४५ वा. च्या सुमारास युसुफवडगाव आणि आडस मंडळात अचानक कडाक्याच्या वादळासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी सोनिजवळा येथे शेतात काम करत असताना वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दिगंबर ससाणे, वय (५० वर्ष) यांनी एका मोठ्या आंब्याच्या झाडाचा आश्रय घेतला. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्याच आंब्याच्या झाडावर अचानक वीज कोसळली आणि झाड उन्मळून पडले. त्याच झाडाखाली उभे असलेले दिगंबर ससाणे यांचा जागीच मृत्य झाला.

शनिवार दि. २३ मे रोजी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास प्रचंड उकाड्या नंतर अचानक कळ्या ढगांनी आभाळ भरून आले आणि त्या नंतर सोसायट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह केज तालुक्यात सोसाट्याच्या वारा आणि विजेच्या गगडाटासह अवकाळी पाऊस पडला. यात युसुफवडगाव, सोनिजवळा, धनेगाव, भालगाव, बावची, साळेगाव, माळेगांव, सुर्डी, सोनेसांगवी, सुकळी, गोटेगाव, मोटेगाव, बोबडेवाडी परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले.

पावसापासून बचाव करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू :- सोनिजवळा येथे शेतात काम करीत असलेले ५० वर्ष वयाचे दिगंबर ससाणे हे आंब्याच्या झाडाच्या निवाऱ्याला उभे राहिले असताना आंब्याच्या झाडावर वीज कोसळून ते झाड उन्मळून पडल्याने झाडाखाली दबून दिगंबर भीमराव ससाणे यांचा जागीच गतप्राण झाले. तर नियतीचा खेळ इथेच न संपता दिगंबर ससाणे यांच्या घरा समोर असलेले चिंचेचे झाड देखील उन्मळून पडले. तसेच धनेगाव येथे एका उभ्या कारवर झाड पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब व रोहित्र याचे खांब पडल्याने नुकसान झाले असून काढणीला आंब्याचा वादळामुळे खच पडला आहे.तालुक्यातील अनेक गावात अनेकांच्या घरांचे पत्रे देखील उडून गेले आहेत.

आंबा, केळी आणि पपई पिकांचे प्रचंड नुकसान :- वादळ आणि पावसाने केळीच्या व पपईच्या बागा उन्मळून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर आंब्याचा देखील खच पडला आहे.

अवकाळी पाऊस आणि वादळाने झालेल्या नुसणीची माहिती घेण्यासाठी ग्राममहसूल अधिकाऱ्यांना नुकसानीची माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- अशोक भंडारे, प्रभारी तहसीलदार केज

केज तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने युसुफवडगाव कृषी मंडळातील युसुफ वडगाव, भालगाव बावची, आनेगाव, नायगाव, सोनेसांगवी, आवसगाव, सोनिजवळा तसेच आडस कृषी मंडळात झालेल्या नुकसानीचे कृषी सहाय्यक अधिकारी यांनी पंचनामे सुरू केले आहेत.

सागर पठाडे, तालुका कृषी अधिकारी, केज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news