

Two-wheeler rider killed on the spot on Tintarvani-Matori Road
गेवराई, पुढारी वृत्तसेवा कल्याण विशाखापट्टणम या महामार्गावरील मातोरी जवळ अपघाताची घटना घडली. रात्री सुमारे ८.४२ वाजण्याच्या दरम्यान पिकअप व दुचाकीच्या झालेल्या दुर्दैवी घटनेत वसमतचे दुचाकीस्वार सुरेश नामदेव आळणे (वय ३६) हे जागीच ठार आहेत.
बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील तिंतरवणी ते मातोरी दरम्यान गुरुवार दि. १९ रोजी हा अपघात झाला. स्प्लेंडर (क्र. एम. एच पुण्याहून वसमतकडे जात असताना, समोरून येणाऱ्या पिकअपने (नंवरच नाही) दुचाकीला जोराची धडक दिली.
१२ जी. एक्स ९४५६) ही दुचाकी घडकेची तीव्रता इतकी होती की, पिकअप वाहनही रस्त्याच्या कडेला दरीत जाऊन पडले. परिणामी वसमत येथील सुरेश नामदेव आळणे यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलीस कर्मचारी किरण मिसाळ यांनी सांगितले.