Beed Accident : दोन कारची समोरासमोर जोरदार धडक; एकाचा मृत्यू

गेवराईतील नवीन बसस्थानकाजवळील घटना
Beed Accident News
दोन कारची समोरासमोर जोरदार धडक एकाचा मृत्यू
Published on
Updated on

गेवराई : शहरातील नवीन बसस्थानकाजवळील शारदा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात संतोष अंकुशराव पाचपुते (रा. गेवराई) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.३) रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन बसस्थानकाकडून येणारी एक कार आणि समोरून येणारी दुसरी कार (क्र. एमएच १२ बीपी ६९३९ व एमएच १४ जेए ३६४६) यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. एका वाहनाचा बंपर व इंजिनचा भाग रस्त्यावर विखुरलेला दिसून आला. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतोष पाचपुते यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news