

Two and a half kilos of silver ornaments were offered at the feet of Tembe Ganesha.
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माजलगाव शहराचा महाराजा म्हणून ओळखला जाणारा, निजामकालीन परवानगी ऐतिहासिक टेंबे गणपती उत्सव यंदाही भक्ती-श्रद्धेच्या वातावरणात सुरू झाला आहे. स्थापनेच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी तब्बल पावणेदोन किलो चांदीचे दागिने श्रीचरणी अर्पण करून गणरायाविषयी अस लेली अखंड भक्ती व श्रद्धा व्यक्त केली.
टेंबे गणपती हा माजलगाव शहराचा पारंपरिक व ऐतिहासिक गणपती मानला जातो. निजामशाही काळात याला औपचारिक परवानगी मिळाल्यामुळे हा गणपती राजसत्त् तसेच ोच्या छत्रछायेखाली साजरा होण-असलेला ारा एकमेव उत्सव ठरला. त्या काळापासून आजतागायत अखंड परंपरा अबाधित राहिली असून हा उत्सव शहरातील धार्मिक व सांस्कृतिक ऐक्याचा दुवा बनला आहे. यंदाच्या उत्सवात गाणगापूर दत्तमंदिर व तिरुपती बालाजी मंदिराचा आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे. तीन दिवसीय गणेशयाग, महिलांचे सामूहिक भजन, तसेच आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर यांसारखे उपक्रम गणेशोत्सवात रंगतदार ठरणार आहेत.
उत्सवाच्या पहिल्याच दिवशी श्रीचरणी पावणेदोन किलो चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले. यात सोंड भारती व्दारकादास मुंदडा, हात डॉ. आर. जी. बजाज, कान सचिन व गिरीश बजाज, कंगन सचिन श्रीकांत रूद्रवार यांनी अर्पण केले, तर चांदीचे मोदक व दुर्वा देखील अर्पण करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंडळाचे अध्यक्ष अनंतशास्त्री जोशी यांनी हार-तुऱ्यांऐवजी शिक्षणाला चालना देणारे प्रतीक म्हणून श्रीचरणी वही व पेन अर्पण करण्याचे आवाहन केले आहे. राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने टेंबे गणपतीच्या दर्शनासाठी दाखल होत असून पारंपरिक गणरायाची महती वाढतच आहे.