Mobile Reels : तासन्तास रिल्स पाहणाऱ्यांची उडू शकते झोप !

लक्ष केंद्रित करण्यातही समस्या; मोबाईलच्या व्यसनाचे दुष्परिणाम
Mobile Reels lose sleep
Mobile Reels : तासन्तास रिल्स पाहणाऱ्यांची उडू शकते झोप ! File Photo
Published on
Updated on

Those who watch reels for hours may lose sleep!

गजानन चौकटे

गेवराई : लहानांपासून ते तीस पस्तीशीतलेही मोबाईलवर रील्स, व्हिडिओ तयार करत असल्याचे दिसून यात आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी जणू एक हे एक व्यसन होऊन बसले आहे. या सवयी झोपेवर परिणाम तर करतच आहेत, यामुळे अनेक जण मेंदूविकाराच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. मोबाईल अतिवापर हा मुलापुरता राहिलेला नसून यात तीस-पस्तीशीतले अन् पत्राशितले यांना देखील फटका बसत आहे.

Mobile Reels lose sleep
Beed News : कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट ?, आ. रोहित पवारांचा पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप

आजच्या डिजिटल (संगणकीय) युगात स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मिडियाच्या झगमगाटात रिल्स, व्हिडिओ तयार करणे हे आता तरुणापासून ते प्रौढांचे जणू काय एक छंद बनले आहे. मात्र, ही सवय आता धोकादायक बनत चालली आहे.

सतत सोशल मिडियावर काही सेकंदाच्या रिल्स, व्हिडिओ पाहणे हे तासनतास स्क्रीन वर राहणे, मेंदूला थकवा देणारे बनले आहे. यामुळे पुरेशी झोप न होणे अन् वेळेचे भान देखील रहात नाही. दरम्यान, ही सवय केवळ तरुण वर्गात नाही तर तीस पस्तीस ते पन्नास वयापर्यंत असलेले नागरिक यांना देखील लागलेली आहे. यामुळे तीस ते पस्तीस वयातच डोकेदुखी, चक्कर येणे अशा मेंदूवर गडबड करणा-या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत. झोप ही मेंदूसाठी ऑक्सिजन असून, अपु-या झोपेमुळे रिस्टोरेशन प्रोसेस पुर्ण होत नाही.

Mobile Reels lose sleep
Beed News : प्रकाशदादांना बळ; भाजपात खळबळ

आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

मोबाईलच्या स्क्रीनवर सतत, राहील्यास डोकेदुखी तसेच डोळ्यांवर याचा मोठा परिणाम तर होतोच शिवाय हालचाल होत नसल्याने मेंदुला देखील याचा परिणाम होतो. त्यामुळे मोबाईल वापर करताना मर्यादा पाळाव्यात असा सल्ला नेत्ररोगतज्ञ डॉ. किशन देशमुख यांनी दिला आहे.

या उपाययोजना करा

दर तासाला स्क्रीन पासून थांबा घ्या, आठ ते दहा तास झोप घ्या, स्क्रीन टाईमच्या मर्यादा पाळा, व्यायाम, ध्यानधारणा, योगा याचा सराव करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news