Beed Crime News : धाडसी चोरी; पंधरा तोळे सोने ५० हजारांची रोकड लंपास

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून धारूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Crime News
Beed Crime News : धाडसी चोरी; पंधरा तोळे सोने ५० हजारांची रोकड लंपासFile Photo
Published on
Updated on

Theft; Fifteen tolas of gold and cash worth 50 thousand stolen

धारूर, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील आंबेवडगाव येथे रविवारी (१६ नोव्हेंबर) रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून १५ तोळे सोने आणि ५० हजार रुपयांहून अधिक रोकड असा मोठा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून धारूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime News
Beed Crime | चोरट्यांनी पळवल्या तब्बल दहा लाखांच्या सिगारेट : माजलगावात होलसेल दुकान फोडले

आंबेवडगाव येथील माणिक तुळशीराम घोळवे आणि मोकिंदा धर्मराज घोळवे यांच्या घरी ही चोरी करण्यात आली. रात्री अंदाजे एकच्या दरम्यान वीज पुरवठ्यात बिघाड निर्माण करून चोरटे गावात शिरल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरट्यांनी प्रथम माणिक घोळवे यांच्या घराचे लोखंडी गेट तोडले. घरातील कुटुंब झोपलेले पाहून त्यांनी बाहेरून दरवाजे कड्या लावून बंद केले.

त्यानंतर मागील बाजूच्या खोलीत प्रवेश करून कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त करत ६ ते ७ तोळे सोने आणि ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी घेतली. त्यानंतर मोकिंदा घोळवे यांच्या घराचेही कुलूप तोडण्यात आले. वरच्या मजल्यावर सुधीर घोळवे तर खालच्या मजल्यावर मोकिंदा घोळवे झोपलेले असताना चोरट्यांनी कपाटे, पेट्या, सुटकेस उघडल्या तसेच एक संदूक घेऊन मोडण्याचा प्रयत्न केला.

Beed Crime News
Sushma Andhare | आधी ठरलं.....आता फिस्कटलं! परळीत शिवसेना (उबाठा) स्वतंत्र लढणारः सुषमा अंधारेंची घोषणा

दरम्यान पंचफुलाबाई घोळवे यांना आवाज आल्याने त्या जाग्या झाल्या आणि आरडाओरड केली. तोपर्यंत चोरट्यांनी संदूक घेऊन पळ काढला. गोंधळ ऐकून कांताराम घोळवे व शांताबाई घोळवे तसेच इतर गावकरी घराबाहेर धावून आले.

माणिक घोळवे यांच्या घरातून दार बाहेरून लावलेले आहे, उघडा ! असा आवाज येत होता. गावकऱ्यांनी दार उघडताच संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र तोपर्यंत चोर फरार झाले होते. घटनास्थळाजवळून एक मोटारसायकल धारूरकडून येऊन तेलगावकडे गेल्याचे नागरिकांनी सांगितले असून पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे. धारूर पोलिस ठाण्याचे एपीआय देविदास वाघमोडे व सानप यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news