Sushma Andhare | आधी ठरलं.....आता फिस्कटलं! परळीत शिवसेना (उबाठा) स्वतंत्र लढणारः सुषमा अंधारेंची घोषणा

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सोबत उबाठा शिवसेनसोबत आघाडीची सुरु होती चर्चा
Sushma Andhare
Sushma Andhare
Published on
Updated on

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख तीनही घटक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने स्वतंत्र निवडणूक लढवताना दिसत आहेत. काँग्रेसने अगोदरच स्वबळावर निवडणूक लढवण्याचे घोषित केलेले आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सोबत उबाठा शिवसेनसोबत आघाडी असल्याचे म्हटले होते. मात्र जागा वाटपात त्यांची आघाडी फिस्कटली असुन आता परळीतील नगराध्यक्षपद व काही निवडक जागा उबाठा शिवसेना स्वतंत्रपणाने लढणार असल्याची घोषणा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Sushma Andhare
Sushma Andhare | ससाईड नोटमधील अक्षर महिला डॉक्टरचे नाही: सुषमा अंधारेंचा दावा

याबाबत शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले की, परळी येथे सक्षमपणे महाविकास आघाडी म्हणून लढावे अशी आमची भूमिका होती. यासाठी अतिशय नम्रपणाने आम्ही काही निवडक जागांची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडीत राहून काही निवडक जागा लढविण्यावर आम्ही सहमती दर्शविली.

Sushma Andhare
Parli Nagar Parishad Reservation | परळी वैजनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

मात्र तरीही समाधानकारक जागा सोडण्यासाठी त्यांना अडचण आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेनेला काही निवडक जागाही देण्यात असहमती दर्शवली. त्यामुळे पक्ष म्हणून स्वतंत्र अस्तित्व राखणे आमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे परळीतील नगराध्यक्ष पदासह सहा जागा शिवसेना (उबाठा) स्वतंत्रपणे लढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

दरम्यान परळी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने गायत्री निलेश पालीवाल यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून नामांकन भरलेले आहे. तर अन्य नगरसेवक पदाच्या सहा जागांवर शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news