परळीत गोमातांना गुंगीचे औषध देण्याचा अघोरी प्रकार; पशुसंवर्धन मंत्र्यांकडून 'दखल', गुन्हा दाखल

'पुढारीने' प्रकरण पुढे आणताच झाली कारवाई
Cows Smuggling News
परळीत गोमातांना गुंगीचे औषध देण्याचा अघोरी प्रकार; पशुसंवर्धन मंत्र्यांकडून 'दखल', गुन्हा दाखलPudhari File Photo
Published on
Updated on

Beed : Cows Smuggling News

परळी वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा

गायींना गुंगीचे औषध देऊन त्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसल्याचा प्रकार शहरात समोर आला. स्नेहनगरमधील नागरिक पोलीस ठाण्यात गेले, मात्र दिवसभरात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याबाबत 'पुढारीने' हे प्रकरण सर्वात आधी पुढे आणल्यानंतर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर काल (दि.२६) मध्यरात्री परळीत पोलीसांनी या संतापजनक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Cows Smuggling News
Santosh deshmukha Murder Case | वाल्मीक कराडची सिटीस्कॅन तपासणी : बोलण्यास, श्वास घेण्यास त्रास

परळी शहरातील स्नेहनगर भागात दि.२५ रोजी मध्यरात्रीनंतर साधारण २ वाजण्याच्या सुमारास गायींना खाण्याच्या पदार्थांमधून औषध देण्याचा संतापजनक प्रकार घडला. गायींना बेशुद्ध करून त्यांची तस्करी करण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न होता. स्थानिक रहिवाशांनी सतर्कता दाखवून हा प्रयत्न हाणून पाडला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी स्नेहनगर भागातील नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले, मात्र चौकशी करुन गुन्हा दाखल करु असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दिवसभरात या प्रकरणात पोलीसांनी गुन्हा नोंदवून घेतलाच नाही. या आघोरी प्रकाराचे वास्तविक सविस्तर चित्र पुढारीने बातमीच्या माध्यमातून पुढे आणले. याची राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी दखल घेतली. त्यांनी तातडीने पोलिस अधीक्षक व स्थानिक पोलिस निरीक्षक यांना या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांना तातडीने अटक करून कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गुंगीचे औषध मिश्रित पदार्थ खाल्याने ज्या गायी बाधित झाल्या होत्या. त्यावर त्वरेने उपचार करण्यास सांगितल्यानंतर पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी उपचार करून चार गायींना धोक्या बाहेर काढले.

Cows Smuggling News
Beed crime: बीडच्या कारागृहातील अधिकार्‍यासह कर्मचारी निलंबित

अखेर मध्यरात्री झाला गुन्हा दाखल...

दत्तात्रया वामनराव दुंदुले यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आघोरी प्रकाराचा घटनाक्रम फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, दि.२६/०५/ २०२५ रोजी रात्री 02.00 वा सुमारास घरा समोर कुत्रे भुंकत असल्याने दतात्रय दुंदुले यांनी घराच्या बाहेर गॅलरीमध्ये येवुन पाहीले असता, घरासमोरील पटांगणात गाई बसत असलेल्या ठिकाणी दोन अनोळखी इसम काहितरी गाईला खाण्यासाठी टाकत होते. ते गाईने खाल्यानंतर थोड्याच वेळात तीन ते चार गाई जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी बाहेर येवून आरडा ओरडा केल्याने दोन अनोळखी इसम यांनी काही अंतरावर लवलेल्‍या चारचाकी वाहनात बसुन पळ काढला.

त्यानंतर त्यांनी गल्लीतील धनंजय सोळंके, राजेंद्र सोनी, वैजनाथ बेरुळे यांना फोन करून बोलावुन घेतले. पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता, नाईट राउंडचे पोलीस कर्मचारी घटनेच्या ठिकाणी आले. त्यानंतर सकाळी पशु वैद्यकीय अधिकारी यांना बोलावुन बेशुध्द झालेल्या गाईंवर औषधोपचार केले.

आमच्या गल्लीत मोकळ्या पटांगणात थांबलेल्या मोकाट जनावरांवर अनोळखी इसमांनी काहीतरी खाण्यास देवुन विषप्रयोग करून जनावरांना विकलांग करण्याचा व बेशुध्द करुन चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. या आशयाच्या फिर्यादीवरुन अनोळखी दोन इसमांवर पोस्टे परळी शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दराडे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news