

बीड : संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला बोलण्यास व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने दुपारी बीड जिल्हा कारागृहात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्याचे सल्ला दिला होता.
त्यानुसार रात्री बीडच्या जिल्हा रुग्णालयात वाल्मीक कराडची सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली.. या तपासणीचा अहवाल रात्री उशिरा येणार असून यानंतरच पुढील उपचाराची दिशा ठरणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले..
दरम्यान बीड येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये मार्च महिन्यात कैद्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर काही कैद्यांना मारहाण झाली होती. त्यामध्ये संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांना महादेव गीते, अक्षय आठवले यांनी मारहाण केली होती.