

Beed prison staff suspension
बीड : बीड जिल्हा कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकार्यासह एका महिला कर्मचार्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी दक्षता पथकाने अचानक भेट दिली होती, त्यावेळी या दोघांकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे समोर आले होते.
संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी बीड जिल्हा कारागृहात आहेत. या दरम्यान कारागृहात कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे आरोप वारंवार केले जात होते. यामुळे जेल प्रशासनाकडून वारंवार तपासणी केली जात आहे.
यामध्ये नुकतेच प्रतिनियुक्तीवर रुजू झालेले वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी.डी. कवाळे व कॉन्स्टेबल सिमा गोरे यांच्याकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे तपासणीत समोर आले होते. त्यानुसार या दोघांनाही निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड सध्या बीडच्या कारागृहात आहे. शनिवारी दुपारी वाल्मीक कराडला अस्वस्थत वाटू लागल्याने बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना माहिती देण्यात आली होती. त्यानुसार डॉक्टरांनी कारागृहात दाखल होत तपासणी केली. यानंतर रक्तचाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल आल्यानंतर उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.