Beed Crime News : ट्रकमालकाने केली ५७० पोती हळद लंपास

व्यापाऱ्याची ३७ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
Beed Crime News
Beed Crime News : ट्रकमालकाने केली ५७० पोती हळद लंपास File Photo
Published on
Updated on

The truck owner looted 570 sacks of turmeric

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा ट्रक मालक व चालकाने संगनमत करून तब्बल ५७० पोती हळद गायब करत व्यापाऱ्याची तब्बल ३७ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात ट्रक मालक नदीम खान मुजाहेद खान (रा. परभणी) व चालक सय्यद अजगर सय्यद सज्जान (रा. परभणी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Beed Crime News
Sandeep Kshirsagar : कपिलधारवाडी गावकऱ्यांचे जीव धोक्यात; तातडीने पुनर्वसन करा

प्रीतेश दुर्गाप्रसाद सोनी, संचालक, दुर्वा कमोडिटी प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० सप्टेंबर रोजी राधा सर्वेश्वर कंपनी सोलापूरमार्फत ३० टन हळद खरेदी करण्यात आली होती. ही हळद सांगलीला पाठवण्यासाठी ट्रक (क्र. चक २६ ऊ २९३५) द्वारे वाहतूक ठरली. मात्र, प्रवासादरम्यान ट्रकमधून तब्बल ५७० पोती हळद गायब करण्यात आली. ट्रक मालक नदीम खान यांनी सुरुवातीला फिर्यादी सोनी यांना कळंब फाटा, अंबाजोगाईजवळ अज्ञात लोकांनी ट्रक लुटला अशी खोटी माहिती दिली.

मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर ट्रकमध्ये फक्त ३० पोतेच शिल्लक असल्याचे आढळून आले. चौकशीत चालक सय्यद अजगरने कबुली दिली की ट्रक लुटलेला नसून मालक नदीम खान यांनीच संगणमत करून हळद लंपास केली आणि पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली.

Beed Crime News
Success story: शेतकऱ्याच्या संघर्षाचं झालं सोनं! गेवराई तालुक्यातील चार सख्या बहिणी झाल्या पोलिस

या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ३१६ (२), ३१६ (३), ३१८(४), २१७व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सपोनि जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान व्यापाऱ्याची ३७ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याने व्यापारी वर्गात सध्या एकच खळबळ माजली असून मालाची वाहतूक कोणत्या विश्वासावर करावी असा प्रशन त्यांच्या समोर उभा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news