Crop Insurance Process : एकाच कापसाचे तीन काट्यांवर वेगवेगळे वजन

पीक विमा कंपनीच्या कापणी प्रयोगात तफावत; शेतकरी मस्के यांनी उपस्थित केला प्रश्न
Crop Insurance Process
Crop Insurance Process : एकाच कापसाचे तीन काट्यांवर वेगवेगळे वजनfile photo
Published on: 
Updated on: 

The same cotton shows different weights on three scales

वडवणी, पुढारी वृत्तसेवा : बाहेगव्हाण येथे पीक कापणी प्रयोगादरम्यान एकाच कापसाचे वेगवेगळ्या वजन काट्यांवर मोठ्या प्रमाणात तफावत असलेले वजन निघाल्याने पीक विमा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणलेल्या दोन काट्यांवर कापसाचे अनुक्रमे १७ किलो ६०० ग्रॅम आणि ४ किलो ७०० ग्रॅम, तर शेतकरी अतुल मस्के यांनी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक काट्यावर त्याच कापसाचे २ किलो १३० ग्रॅम वजन झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Crop Insurance Process
Beed News : शंभर टक्के दरवाढीसाठी ऊसतोड मजुरांचा संप

बाहेगव्हाण येथील गट क्रमांक २४२ मध्ये सुमारे २० मीटर लांब व १० मीटर रुंद क्षेत्रातील कापूस वेचून पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. यावेळी विमा कंपनीचे कर्मचारी, ग्रामसेवक आणि शेतकरी उपस्थित होते. मात्र, एकाच कापसाचे तीन वेगवेगळ्या काट्यांवर एवढे भिन्न वजन आल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. अतुल मस्के यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला; मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

पीक कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादन निश्चित करून पीक नुकसान व विमा भरपाईची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे वजन काट्याच्या अचूकतेबाबतच प्रश्न निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाईवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराची प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधित काट्यांची अचूकता व प्रमाणपत्र तपासावे, तसेच पीक कापणी प्रयोगाची फेरतपासणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पीक कापणी प्रयोगाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अचूक वजन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Crop Insurance Process
Parli News : माजी सरपंच शिवाजीराव शिंदे यांनी जीवन संपवले

विमा कंपनीच्या प्रतिनिधीची चौकशी करा

बाहेगव्हाण येथील प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधीची चौकशी करावी. चौकशीत गैरप्रकार किंवा निष्काळजीपणा आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

तफावत गंभीर, न्याय द्या

पीक कापणी प्रयोगात एकाच कापसाचे वेगवेगळ्या काट्यांवर मोठ्या फरकाने वजन झाल्याचा दावा समोर आले आहेत. संबंधित वजन काट्यांची अचूकता तपासून दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news