

गौतम बचुटे
केज : पाच लाख रु. घेऊन विक्री केलेली थार गाडी पुन्हा रात्री घरा समोरून विक्री करणारेच चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी पाच जणां विरुद्ध वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. ३० जुलै २०२५ रोजी राहुल रामहरी कांदे (रा. जिरेवाडी ता. परळी) यांनी पुणे येथील प्रताप शेषेराव राठोड याच्या मालकीची थार गाडी क्र. (एम एच- १२/ डब्ल्यू के- २२७६) पाच लाख रु. घेऊन करारनामा करून विकत घेतली. या व्यवहारात प्रताप शेषेराव राठोड आणि त्यांचे मित्र संजय गुलाब पवार, (रा. परळी), शहबाज खान, (रा. परळी), रवि मुंडे, (रा. अंबाजोगाई), गणेश नडगीरे, (रा. धारुर) यांनी संगणमत करुन राहुल रामहरी कांदे, (रा. जिरेवाडी ता. परळी) यांच्या कडून नगदी पाच लाख रुपये घेतले व त्या बदल्यात त्यांनी त्यांची थार गाडीची प्रताप राठोड याचे ताब्यातील गाडीची चावी दिली. रात्री ११:३० वा. चे सुमारास थार गाडी घेवुन ते परळीकडे गेले. रात्री १:०० वा. चे सुमारास राहुल कांदे घरी पोहचलो व गाडी घरा समोर लावली व झोपले.
दि. ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ६:०० वा. चे सुमारास त्यांनी झोपेतून उठल्या नंतर व घरा बाहेर येवुन पाहणी केली असता, घरा समोर उभी केलेली गाडी दिसुन आली नाही. तेव्हा राहुल कांदे यांनी संजय पवार यास फोन करून गाडी बाबत विचारणा केली. मात्र त्याने माहिती नसल्याचे सांगितले.
सीसीटीव्हीमुळे गाडी घेऊन जाणारा सापडला :- राहुल कांदे यांनी त्यांच्या घराचे आजुबाजुच्या सिसीटीव्हीची पाहणी केली असता, सदर गाडी घेऊन जाण्यासाठी एक स्विफ्ट कार आली होती. त्यामधील लोकांनी काही क्षणातच सदरची गाडी अतिवेगता घेवुन गेल्याचे दिसुन आले.
त्यामुळे राहुल कांदे आणि त्यांचा मित्र आनंद मुंजाजी धाटे असे पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे गेले, तेव्हा तेथे संजय पवार हा पण आला होता. त्या वेळी रवी मुंडे, (रा. अंबाजोगाई) हा आला. तो म्हणाला की, सदरची गाडी मालक प्रताप राठोड, (रा. पुणे) हाच घेवुन गेला आहे. त्यामुळे तुम्ही केस करण्याचे भानगडीत पडु नका. तो तुमचे पैसे परत देणार आहे. त्यास बोललो आहे. तो पैसे दोन ते तीन दिवसात परत करणार आहे. असे त्याने सांगितल्या नंतर राहुल कांदे हे परत घरी आले. दोन- चार दिवसांनी रवि मुंडे, संजय पवार, शहबाज खान यांना पैश्याची मागणी केली असता त्यांनी मला तुम्ही थांबा पैसे मिळुन जातील. असे सांगीतले. परंतु त्यांनी पैसे दिले नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर दिली पोलिसात तक्रार :- थार गाडी प्रकरणी पाच लाख रु घेऊन करार करून ताब्यात दिलेली थार गाडी चोरून नेवून पैसे परत न दिल्या प्रकरणी राहुल कांदे यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी संजय गुलाब पवार, (रा. परळी), शहबाज खान, (रा. परळी), रवि मुंडे, (रा. अंबाजोगाई), गणेश नडगीरे, (रा. धारुर), प्रताप राठोड, (रा. पुणे) यांनी संगणमत करुन फसवणूक करुन संजय गुलाब पवार, (रा. परळी), शहबाज खान, (रा. परळी), रवि मुंडे, (रा. अंबाजोगाई), गणेश नडगीरे, (रा. धारुर), प्रताप राठोड (रा. पुणे) यांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ६०३/२०२५ भा. न्या. सं. ३०३(२), ११८(२), ११८(३), ३३८, ३४०(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर हे करीत आहेत.