रांजणी शाळेत शिक्षक गैरहजर; क्षणाधिकाऱ्यांनी वाजवली घंटा

गेवराई तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी सकाळी शिक्षक वेळेत उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
beed news
रांजणी शाळेत शिक्षक गैरहजर; क्षणाधिकाऱ्यांनी वाजवली घंटाfile photo
Published on
Updated on

Teachers absent at Ranjani School; Education Officers ring bell

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी सकाळी शिक्षक वेळेत उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुंवर यांनी अचानक भेट दिली असता शाळेत एकही शिक्षक किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांना जागेवरच कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

beed news
Beed wrestling competition: बीड येथे होणार स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी दिली मान्यता

मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग चालतात. या शाळेत मुख्याध्यापकांसह एकूण सहा शिक्षक कार्यरत असून सुमारे शंभराच्या आसपास विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.

दरम्यान, गुरुवारी सकाळी डॉ. किरण कुंवर या माजलगावकडे जात असताना सुमारे पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अचानक रांजणी येथील शाळेला भेट दिली. मात्र शाळेच्या वेळ `तही तेथे मुख्याध्यापक, शिक्षक किंवा इतर कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. शाळेच्या आवारात विद्यार्थी मात्र थांबलेले होते.

beed news
केज-कळंब रोडवर भीषण अपघात; उभ्या ट्रकला एसटी बसची जोरदार धडक

ही परिस्थिती पाहून शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुंवर यांनी स्वतः शाळेची घंटा वाजवली आणि विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याच्या सूचना दिल्या. काही वेळानंतर शिक्षक शाळेत पोहोचले. शाळेच्या वेळेत शिक्षक गैरहजर असल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. तसेच नोटिसांमध्ये या प्रकाराबाबत समाधानकारक खुलासा न केल्यास संबंधितांवर कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

लेटलतीफांवर कारवाईचा इशारा शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पवित्र जागा आहे. शाळेच्या वेळेत शिक्षकच उपस्थित नसतील तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होते. म्हणूनच मला स्वतः शाळेची घंटा वाजवून विद्यार्थ्यांना वर्गात बसवावे लागले. वेळेचे पालन न करणाऱ्या शिक्षकांकडून समाधानकारक खुलासा न आल्यास नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल.
-डॉ. किरण कुंवर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बीड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news