sunetra pawar life threat: चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका...? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची दखल घेण्याची विनंती

sunetra pawar life threat
sunetra pawar life threatpudhari
Published on
Updated on

Sunetra Pawar Rupali Chakankar: अशोक खरात उर्फ 'हिंदू बाबा' प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीविताला रूपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याची धक्कादायक तक्रार बीडमधील एका इसमाने एसआयटी (SIT) कडे नोंदवली आहे. या तक्रारीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

sunetra pawar life threat
Bhondubaba Ashok Kharat case |महाराष्ट्रावरचे लांच्छन पुसा!

उदयकुमार आहेर यांचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी या प्रकरणाचा 'एक्सपोज' करत मोठा दावा केला आहे. आहेर यांच्या मते, अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असलेल्या काही घडामोडी आणि रूपाली चाकणकर यांचे खरातच्या ट्रस्टशी असलेले संबंध पाहता, ही तक्रार गांभीर्याने घेण्यासारखी आहे. "दादांच्या (अजित पवार) बंगल्याबाहेर झालेल्या त्या संशयास्पद 'अघोरी पूजा' आणि त्यांच्या अपघातामध्ये या भोंदू बाबाचा काही संबंध आहे का? याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे," अशी मागणी आहेर यांनी केली आहे.

sunetra pawar life threat
Rupali Chakanakar: अशोक खरात प्रकरणाला नवं वळण; रूपाली चाकणकर फरार, रुपाली पाटील ठोंबरेंच्या पोस्टमुळे खळबळ

तक्रारीचे स्वरूप आणि SIT तपास

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील एका तक्रारदाराने एसआयटीकडे धाव घेत म्हटले आहे की, सुनेत्रा पवार यांना त्यांच्याच पक्षातील माजी महिला प्रदेशाध्यक्षांकडून धोका असू शकतो. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने तपास सुरू केला आहे.

सुरज चव्हाण यांची प्रतिक्रिया: राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सांगितले की, "सुनेत्रा वहिनींना Z+ सुरक्षा असली, तरी प्रशासनाने या तक्रारीची दखल घेतली आहे. ही तक्रार राजकीय हेतूने प्रेरित आहे की यात काही तथ्य आहे, याचा शोध एसआयटी घेत आहे."

sunetra pawar life threat
Anjali Damania On Chakankar: कर्माची फळं मिळाली... चाकणकरांचा राजीनामा मुंडेंना समर्पित करायला हवा... दमानियांची टोलेबाजी

चाकणकरांचा राजीनामा आणि खरात कनेक्शन

अशोक खरातच्या 'अध्यात्मिक' ट्रस्टवर रूपाली चाकणकर या विश्वस्त (Trustee) होत्या. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चाकणकर यांना महिला आयोग अध्यक्षपद आणि पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याच राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर आता थेट जीविताला धोका असल्याचे आरोप होत असल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news