Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहात विशेष सुविधा ?

धनंजय देशमुख यांचा आरोप; मुख्यमंत्री, कारागृह विभागप्रमुखांना पाठवले पत्र
Santosh Deshmukh Murder Case|
संतोष देशमुख हत्‍या प्रकरण(File Photo)
Published on
Updated on

Special facilities in prison for the accused in the Santosh Deshmukh murder case?

बीड, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील मसाजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना बीड जिल्हा कारागृहात विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री तसेच कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवले असल्याचे सांगून माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले.

Santosh Deshmukh Murder Case|
Beed crime news : २५ तोळे सोने अवघ्या ५ लाखांत; स्वस्ताच्या आमिषाने सोलापूरच्या तरुणाची आष्टीत फसवणूक

धनंजय देशमुख म्हणाले, मागील दीड वर्षांचा इतिहास पाहिला तर बीड कारागृहात जेलर बदलले गेले आहेत. कारागृहात काय सुरू आहे, याची माहिती जेलरांनाही अंधारात ठेवून लपवली जात असल्याचे आरोप होत आहेत. तसेच या आरोपी कारागृहात असतानाही त्यांना विशेष सुविधा मिळत आहेत. प्रत्येक कैद्याकडून सिमकार्डचा वापर होत असल्याचे समोर येत असून दीड-दीड तास मोबाईलवर संभाषण केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या सर्व प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

देशमुख यांनी आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलवण्याची मागणीही पुन्हा केली. दीड वर्षांपासून आम्ही या आरोपींना बीड कारागृहातून अन्यत्र हलवण्याची मागणी करत आहोत. इतर प्रकरणांतील आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलवले जाते, मग या आरोपींबाबत वेगळा निकष का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Santosh Deshmukh Murder Case|
Amruta Fadnavis : राऊत यांच्यासारखं बोलण्यापेक्षा गुंगं राहिलेलं बरं

यावेळी त्यांनी माझ्या भावाची हत्या झाली आहे. याची इतर प्रकरणाशी तुलना होऊ शकत नाही. घुले आणि देशमुख ही दोन्ही प्रकरणे वेगळी असून त्यांची तुलना करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

कारागृहाच्या भूमिकेकडे लक्ष

एका आरोपीच्या कारागृहाबाबतच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुरुवातीला एका आरोपीने लातूर कारागृहात हलवण्याचा अर्ज केला, त्यानंतर पुन्हा बीड कारागृहातच ठेवण्याची मागणी केली. यामागील कारणांचीही चौकशी झाली पाहिजे, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले. धनंजय देशमुख यांच्या या आरोपांमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून कारागृह प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news