Amruta Fadnavis : राऊत यांच्यासारखं बोलण्यापेक्षा गुंगं राहिलेलं बरं

संजय राऊत साहेबांसारखं बोलण्यापेक्षा गुंग राहिलेलं बरं, असा खोचक टोला अमृता फडणवीस यांनी लगावला.
Amruta Fadnavis
Amruta FadnavisPudhari
Published on
Updated on

Amruta Fadnavis criticizes Sanjay Raut

बीड, पुढारी वृत्तसेवा : संजय राऊत साहेबांसारखं बोलण्यापेक्षा गुंग राहिलेलं बरं, असा खोचक टोला अमृता फडणवीस यांनी लगावला. आष्टी येथे माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रश्न विचारले असता त्यांनी परखडपणे आपली भूमिका मांडली. सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेल्या 'गुंगी गुडिया' टिप्पणीचा निषेध करत नीट आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या आईबद्दल वापरण्यात आलेल्या भाषेवर टीका केली. समाजसेवेबाबतची आपली भूमिका अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले.

Amruta Fadnavis
Beed crime news : २५ तोळे सोने अवघ्या ५ लाखांत; स्वस्ताच्या आमिषाने सोलापूरच्या तरुणाची आष्टीत फसवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला अमृता फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, "सुरेश धस यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला असून जवळपास ६० हजार नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. अशा उपक्रमांची समाजाला मोठी गरज आहे," असे सांगितले.

बीड जिल्ह्याचा हा आपला पहिलाच दौरा असल्याचे सांगताना त्यांनी जिल्ह्यातील प्रश्न समजून घेण्याची इच्छा व्यक्त केली. विशेषतः ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांसाठी आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Amruta Fadnavis
Beed Kidnapping | केज तालुक्यात तीन जणांचे कथित अपहरण; पारधी समाजातील युवकावर अमानुष मारहाणीचा आरोप

गार्गी जाधवच्या उपचारासंदर्भातही त्यांनी माहिती देताना, काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदतीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत तिच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले.

राजकीय प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या 'गुडिया' या टिप्पणीचा तीव्र निषेध केला. "मतभेद असू शकतात, राजकारणात टीका-टिप्पणीही होत असते; मात्र महिलांबाबत अशा प्रकारची अवमानकारक भाषा वापरणे योग्य नाही. राजकीय संस्कृती जपली गेली पाहिजे," असे त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news