Beed crime news : २५ तोळे सोने अवघ्या ५ लाखांत; स्वस्ताच्या आमिषाने सोलापूरच्या तरुणाची आष्टीत फसवणूक

सोशल मीडियावरून संपर्क; बनावट सोन्याची नाणी देऊन भामटा पसार, अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल
Gold fraud
Gold fraudPudhari
Published on
Updated on

कडा : स्वस्त दरात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवत सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सोशल मीडियावरून ओळख करून घेत आरोपीने २५ तोळे सोने अवघ्या पाच लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवले. मात्र, प्रत्यक्षात बनावट धातूची नाणी देऊन रोख रक्कम घेऊन तो पसार झाला.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील आबासाहेब सुरेश क्षीरसागर (वय ३५) यांच्याशी एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावरून संपर्क साधला. त्याने स्वतःकडे २५ तोळे सोने असल्याचे सांगत ते केवळ पाच लाख रुपयांत देण्याची ऑफर दिली. बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी दर असल्याने क्षीरसागर यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. २ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास आरोपीने त्यांना आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील शेतात बोलावले. तेथे २५ तोळे वजनाची सुमारे १५० बनावट धातूची नाणी सोन्याची असल्याचे सांगून त्यांच्या ताब्यात दिली. त्याबदल्यात पाच लाख रुपये रोख घेत आरोपी तेथून फरार झाला.

Gold fraud
Beed crime news: बनावट आधारकार्ड, नोटरी आणि GPSच्या माध्यमातून थार चोरी करणाऱ्या टोळीचा गेवराई पोलिसांकडून पर्दाफाश

करमाळा येथे परतल्यानंतर नाण्यांची तपासणी केली असता ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आबासाहेब क्षीरसागर यांनी ३ ऑगस्ट रोजी अंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 'गजू डिजे' (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही) या संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Gold fraud
Beed Crime News : सोनपेठ घरकुल घोटाळ्यातील अभियंत्याचा अपघाती मृत्यू: 'घात' की 'अपघात'? चर्चेला उधाण

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर किंवा अनोळखी व्यक्तींकडून स्वस्त दरात सोने, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू देण्याचे आमिष दाखवले जात असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news