Beed News : गोडंबीच्या बिया खाल्ल्याने सात विद्यार्थ्यांना विषबाधा

रायगव्हाण येथील घटना, विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर, पथकाची भेट
Beed News
Beed News : गोडंबीच्या बिया खाल्ल्याने सात विद्यार्थ्यांना विषबाधाfile photo
Published on: 
Updated on: 

Seven students poisoned after eating godambi seeds

आष्टी, पुढारी वृत्तसेवा : परतूर तालुक्यातील रायगव्हाण येथे शाळा सुटल्यानंतर खेळतांना सात विद्यार्थ्यांनी गावातील ओढ्याच्या बाजूस असलेल्या मोगल्या गोडंबीच्या बिया खाल्याने त्यांना अचानक उलटी, जुलाब मळमळ होऊन विषबाधा झाल्याची घटना बुधवार (२८) रोजी घडली. विद्यार्थ्यांवर प्रथम आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना तातडीने जालना येथील जिल्हा रुग्णालय पाठविण्यात आले आहे.

Beed News
Kaij Accident | केज-अंबाजोगाई रस्त्यावर कारची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; दोघे जखमी

सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. रायगव्हाण येथे बुधवारी शाळा सुटल्यानंतर स्वराज संतोष खाडे (वय ७) रुद्र दत्तात्रय खाडे (वय १२), यशश्री सुरेश डोळके (वय ७), आरोही रवी पोटे (वय ७), यश शायस पोटे (वय ८), हनुमान ज्ञानेश्वर सोनटक्के (वय ५) व कार्तिक कृष्णा सोनटक्के (वय ४) या सर्व विद्यार्थ्यांनी गावातील ओढ्याच्या बाजूस असलेल्या मोगल्या गोडंबीच्या झाडांच्या बिया खाल्या.

त्यानंतर त्यांना उलट्या जलান ন मलमल होऊ लागल्याने पालकांनी त्यांना रात्री तावद्वीने आटी प्राथमिक आरोारा केंटात उपचारासाठी नेले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप राठोड यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने जिल्हा रुग्णालय जालना येथे पुढील उपचारासाठी पाठवले. जालना येथील रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Beed News
Beed News : मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू

आमदार लोणीकरांकडून दखल

परतूर तालुक्याचे आमदार बबनराव लोणीकर यांना दरम्यान ही घटना समजताच त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क करून मुलांवर तातडीने उपचार करण्यासाठी सूचना दिल्या.

आरोग्य पथक गावात

अकोली आरोग्य उपकेंद्रातंर्गत अंतर्गत असलेल्या रायगव्हाण येथे गुरुवार (२९) रोजी डॉ. असद कुरेशी, आरोग्य सेविका अंजली गवळी, आरोग्य सेवक ए. एस. कुमठेकर यांच्या पथकाने भेट देऊन आणखी काही मुलांनी या बिया खाल्या का याचा शोध घेतला. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्याच्या घरीही पथकाने भेट दिली.