Parli News : उन्हाळी सुट्टयांसाठी नातेवाईकांकडे आलेली शाळकरी मुलगी कॅनॉलमध्ये गेली वाहून

१२ तासांच्या शोध मोहिमेनंतर सापडला मृतदेह
School girl drowned in canal
Parli News : उन्हाळी सुट्टयांसाठी नातेवाईकांकडे आलेली शाळकरी मुलगी कॅनॉलमध्ये गेली वाहूनFile Photo
Published on
Updated on

School girl drowned in canal

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा

परळी जवळील नवीन औष्णिक विद्युत केंद्र परिसरात असलेल्या लोणी तांडा येथे उन्हाळी सुट्ट्यांसाठी आपल्या नातेवाईकांकडे राहायला आलेली दहा वर्षांची शाळकरी मुलगी जवळच असलेल्या कॅनलच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्रकार काल (दि. 28) रोजी घडला.

School girl drowned in canal
Parli theft case : अखेर चोराला झाली उपरती..परळीच्या मुख्य डाकघरातून चोरलेले साहित्‍य परत आणून टाकले...

नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन विभागाने तब्बल 12 तास या मुलीचा शोध घेतला. दरम्यान आज (दि.२९ ) सकाळी उक्कडगाव ता. सोनपेठ जिल्हा परभणी जवळील कॅनॉलमध्ये या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे.

सध्या जायकवाडी धरणातून कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे. या कॅनॉलला आलेल्या पाण्यामध्ये कपडे धुत असलेली शाळकरी मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना सोमवार दि 28 रोजी घडली. परळी नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुनील आदोडे, नितीन जगतकर निखील वाघमारे, निखील गोदाम, वाहनचालक विठ्ठल गित्ते आदींनी अथक प्रयत्न करून शोधमोहीम सुरु केली होती. काल रात्री उशिरा पर्यंतही या मुलीचा शोध लागला नाही.

School girl drowned in canal
Beed Crime : 'त्या' ६० वर्षीय महिलेच्या अपहरण प्रकरणाचे वास्तव झाले उघड !

आज सकाळ पुन्हा नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शोध मोहीम सुरू केली असता, उक्कडगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी जवळील कॅनॉलमध्ये या मुलीचा मृतदेह आढळून आला. मृत मुलगी ही पुणे येथील शाळेत शिकायला होती.

उन्हाळी सुट्टीत ती परळीला नातेवाईकांकडे राहयला आली होती. शिवकन्या अजय चव्हाण (वय 10 वर्ष) असे मृत मुलीचे नाव आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. दरम्यान या शाळकरी मुलीच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news