

Sahyadri Devarai will bloom in 10 acres at Shrikshetra Ramgad
बीड, पुढारी वृत्तसेवा: जगाला आपल्याकडून काही देता आलं तर ते वृक्ष लागवडीतून देता येईल. सध्या जगाला हिरव्या मशालींची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकानी आपल्या आई-वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाढदिवसा येवढे झाडे लावली पाहिजेत. असे आवाहन सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. बीड तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथे १० एकर मध्ये फुलणाऱ्या सह्याद्री देवराई प्रकल्पाची सुरूवात त्यांच्या हस्ते ७५ झाडे लावून करण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सिने अभिनेते सयाजी शिंदे बोलत होते. यावेळी लेखक अरविंद जगताप, सह्याद्री देवराई समन्वयक शिवराम घोडके यांची उपस्थिती होती. शहरापासून पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या पालवनच्या डोंगरावर २०१६-१७ मध्ये सिने अभिनेते सयाजी शिंदे, अरविंद जगताप, शिवराम घोडके यांनी वन विभागाच्या २५० एकरमध्ये १ लाख ६४ हजार विविध जातीचे वृक्ष लावून ३ एकर मध्ये ३ घन वन तयार केलेले आहे. त्याच धर्तिवर बीड पासून ७ किलो मीटर अंतरावर असलेल्या रामगडावर १० एकर मध्ये दे-वराई २ होणार आहे.
येथे विविध सुगंधी, पक्षी बसणारे, औषधी, फळ, सावली देणारे १० हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत. तर ४० गुंठ्यामध्ये २ घन वन प्रकल्पाचे काम १५ रोजी मे पासून सुरू झाले आहे. आतापर्यंत येथे ५ हजार खड्डे जेसीबीच्या सहायाने खोदण्यात आले आहे.
या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेवून माध्यमांशी संवाद साधला. श्री क्षेत्र रामगड येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साळवे, डॉ. प्रदीप शेळके, सुहास वायंगणकर, सागर साठे, माजी सरपंच कोंडीराम निकम, शरद निकम हे उपस्थिती होते.
श्री क्षेत्र रामगड येथे होणाऱ्या देवराई प्रकल्पाची सुरूवात लेखक अरविंद जगताप यांच्या वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त येथे वेगवेगळ्या जातीचे ७५ झाडे लावून सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. प्रत्येकानी आपल्या आई-वडिलांच्या वाढदिवसानिमित्त असा उपक्रम राबवावा असे आवाहन सयाजी शिंदे यांनी यावेळी केले.