Mahashivratri 2026 | ‘ओम नम: शिवाय’च्या जयघोषात वैद्यनाथनगरी दुमदुमली : महाशिवरात्रीला विक्रमी गर्दी

Parli Vaijnath | महाशिवरात्रीच्या पावन पर्वकाळात वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
Parli Jyotirlinga Darshan
महाशिवरात्रीच्या पावन पर्वकाळात वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची अलोट गर्दी Pudhari
Published on
Updated on

Parli Vaijnath Jyotirlinga Darshan

परळी वैजनाथ : महाशिवरात्रीच्या पावन पर्वकाळात वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येथे भाविकांची विक्रमी गर्दी उसळली. १४ तारखेच्या मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. “हर हर महादेव” आणि “प्रभू वैद्यनाथ महाराज की जय” अशा जयघोषांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.

देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून लाखो शिवभक्त परळीत दाखल झाले. मध्यरात्रीपासून सायंकाळपर्यंत सुमारे पाच लाखांहून अधिक भाविकांनी प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र स्थळाला महाशिवरात्री निमित्त अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

Parli Jyotirlinga Darshan
Mahashivratri 2026 | 'हर हर महादेव, बम बम बोले'च्या गजरात औंढा नागनाथनगरी दुमदुमली: भाविकांची अलोट गर्दी

दर्शन व्यवस्थेसाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा तसेच पासधारकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांची रांग मंदिरापासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत पोहोचली होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, रंगरंगोटी आणि पुष्पसजावट करण्यात आली होती. पायऱ्यांवर बॅरिकेट्स व मंडपांची उभारणी करून सुरक्षित आणि सुरळीत दर्शनाची सोय करण्यात आली.

वैद्यनाथ देवस्थान आणि पोलीस प्रशासनाने उत्तम नियोजनासह कडक बंदोबस्त ठेवला होता. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी भाविकांसाठी उपवासाच्या फराळाची, पिण्याच्या पाण्याची तसेच खिचडीचे मोफत वाटपाची व्यवस्था केली. परळी शहरात सर्वत्र उत्सवी वातावरण पाहायला मिळाले.

मंदिराचे सचिव प्रा. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, मध्यरात्रीपासून आजपर्यंत जवळपास पाच लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे.

Parli Jyotirlinga Darshan
Mahashivratri 2026: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय आहे संबंध... कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या ज्योतिर्लिंगाची करावी उपासना?

महाशिवरात्री पर्वात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रुद्राभिषेक

महाशिवरात्रीच्या दिवशी बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगावर पारंपरिक पद्धतीने विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला. पंचम ज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवस्थानात दरवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

१५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान पारंपरिक धार्मिक विधी आणि उत्सवांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांच्या उपस्थितीमुळे परळी नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news