

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीला देशभरातील अनेक शिवभक्त भगवान शिवाची आराधाना करतात. व्रत करतात उपवास देखील धरतात. या दिवशी शिवाची आराधना केल्यानं त्यांचे आशीर्वाद मिळतात अशी धारणा आहे. या दिवशी देशभरातील १२ जोतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी भाविक खूप गर्दी करत असतात.
महाशिवरात्री पर्वाचा संबंध हा अनंत प्रकाशाशी आहे. याला शिवाचे स्वरूप मानल गेले आहे. पुराणांमध्ये एक कथा आहे. यात एकदा सृष्टी निर्माण करणारे ब्रम्ह आणि सृष्टीचे पालनकर्ते विष्णू यांच्यात सर्वात महान देव कोण याबाबत वाद निर्माण झाला होता. ब्रम्हांनी मी सृष्टी निर्माण केली त्यामुळं मी श्रेष्ठ असं म्हटलं तर विष्णूंनी जर मी या सृष्टीचे पालन केलं नाही तर ही सृष्टी टिकणार कशी असं म्हटलं.
तेवढ्यात एक मोठा प्रकाश स्तंभ त्यांच्या समोर प्रकट झाला. या स्तंभाचे तेज एवढे जास्त होते की सगळ्या दिशा उजळून निघाल्या होत्या. प्रकाश वर खाली अनंतापर्यंत पसरला होता. या प्रकाशाची सुरूवात आणि शेवट दोन्ही दिसत नव्हते. ब्रम्हा या प्रकाश स्तंभाचा वरचा भाग शोधण्यासाठी आणि विष्णू त्याचा पाया शोधण्यासाठी गेले. मात्र अनेक युगे प्रयत्न केल्यानंतरही त्यांना याचा काही शोध लागला नाही.
शेवटी त्यांनी या स्तंभासमोर येत नतमस्तक होत ही शक्ती महान आहे याचा स्वीकार केला. त्यावेळी या प्रकाश ज्योतीतून शिव प्रकट झाले आणि अनंत प्रकाशाच्या रूपात मीच आहे असं सांगितलं. हे शिवांचे ज्योर्तिलिंग स्वरूप आहे.
ज्योती म्हणते प्राश आणि लिंग यांचा अर्थ प्रतिक. ज्योतिर्लिंग म्हणजे असं प्रतिक जिथं शिव हे अनंत प्रकाश स्वरूपात विराजमान आहेत. सनातन मान्यतेनुसार शिवलिंग हा केवळ एक दगड नाहीये तर सृष्टीची मूळ उर्जेचे प्रतिक आहे. याचा वरचा गोलाकार भाग हा आकाशाचे प्रतिक आहे तर त्याच्या आधाराला योनीपीठ म्हणतात. ते पृथ्वीचं प्रतिक आहे. हे शिव आणि शक्ती यांच्या मिलनाचं प्रतिक मानलं गेलं आहे. चेतना आणि उर्जेचे हे एकत्व आहे.
भारतात १२ ज्योतिर्लिंग असून भगवान शिवांचे हे सर्वात पवित्र आणि स्वयंभू ठिकाणे मानली गेली आहेत. त्यांना अनंत प्रकाशाचे प्रतिक मानलं गेलं आहे. वैदिक ज्योतिषानुसार १२ ज्योतिर्लिंग १२ राशींशी जोडल्या गेल्या आहेत. ही प्रत्येकासाठी एका प्रकारे व्यक्तिगत तीर्थाच्या स्वरूपात काम करतात. याद्वारे ग्रहांचा प्रभाव संतुलित होते. अडचणी दूर होतात आणि आध्यात्मिक प्रगती होते अशी मान्यता आहे.
वैदिक ज्योतिषानुसार व्यक्तीच्या राशीनुसार संबंधित ज्योतिर्लिंगची उपासना करणं खास फलंदायी ठरतं. चला तर मग कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या ज्योतिर्लिंगाची उपासना करावी हे जाणून घेऊयात.
मेष - रामेश्वरम (तमिळनाडू)
हे ज्योतिर्लिंग हे अग्नी तत्वाचं प्रतिक आहे. याद्वारे आवेग आणि अधीरपणा यावर नियंत्रण मिळवण्यात मदत होते. त्याचबरोबर स्पष्टता येते.
वृषभ - सोमनाथ (गुजरात)
हे ज्योतिर्लिंग हे चंद्राचे रक्षक मानलं गेलं आहे. त्यामुळे भावनात्मक स्थिरता येते आणि सहनशीलता वाढते.
मिथून - नागेश्वर (गुजरात)
हे ज्योतिर्लिंग विष आणि राहू, सर्पदोष पासून रक्षण करतं. यामुळं बौद्धिक स्पष्टता येते आणि चंचलपणा नियंत्रणात राहतो.
कर्क - ओंकारेश्वर (मध्येप्रदेश)
हे ज्योतिर्लिंग जल तत्व आणि गुरूच्या ज्ञानाचे प्रतिक आहे. यामुळं मानसिक शांतता आणि भावनात्मक संतुलन प्राप्त होतं.
सिंह - वैद्यनाथ (झारखंड)
हे ज्योतिर्लिंग पंचम भाव म्हणजे बुद्धी आणि मन याचे प्रतिक आहे. यामुळं अहमपणा कमी होतो. आरोग्याला लाभ होतो आणि उर्जेचा पुनर्स्थापना होते.
कन्या - मल्लिकार्जुन (आंध्र प्रदेश)
हे ज्योतिर्लिंग पृथ्वी तत्व आणि बुध यांच्या उच्च अवस्थेशी जोडले गेले आहे. याद्वारे सेवा, कर्तव्य आणि आध्यात्मिक प्रगती याचं संतुलन होतं.
तूळ - महाकालेश्वर (मध्य प्रदेश)
हे ज्योतिर्लिंग न्यायाचं प्रतिनिधित्व करतं. यातून जीवनात सामंज्यस्य आणि संतुलन येतं.
वृश्चिक - घृष्णेश्वर (महाराष्ट्र)
हे ज्योतिर्लिंग परिवर्तन आणि तीव्रता याच्याशी संबंधित आहे. आध्यात्मिक जागरण करण्यास मदत होते.
धनु - काशी विश्वनाथ (उत्तर प्रदेश)
हे ज्योतिर्लिंग मोक्ष आणि ज्ञानमार्गाचे प्रतिक मानले गेले आहे. याद्वारे वैराग्य आणि उच्च न्यानाची प्राप्ती होते.
मकर - भीमाशंकर (महाराष्ट्र)
हे ज्योतिर्लिंग कर्तव्य आणि धैर्याचं प्रतिक आहे. याद्वारे अनुशासनाच्या माध्यमातून यशाची प्राप्ती करण्याची ताकद मिळते.
कुंभ - केदारनाथ (उत्तराखंड)
हे उच्च दर्शन आणि वैराग्याशी संबंधित आहे. ध्यान आणि जीवनाच्या उच्च उद्येशाची अनुभूती हे ज्योतिर्लिंग करून देतं.
मीन - त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र)
हे ज्योतिर्लिंग शुक्राची उपासणा आणि पवित्र जल याच्याशी जोडलं गेलं आहे. त्यामुळं भावनांचे शुद्धीकरण आणि आध्यात्मिक विकास होतो.