Ramdas Athawale | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळवून देणार : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

सुप्रिया सुळेंच्या जावयाला जमीन देता, मग गोरगरिबांना का नाही? : पप्पू कागदे
Marathwada Drought Crisis
Ramdas Athawale Beed Visitpudhari photo
Published on: 
Updated on: 

बीड : दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबांचे जगणे कठीण झाले असून, बीडसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.

बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आयोजित विराट जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो महिला उपस्थित होत्या.

Marathwada Drought Crisis
Sunetra Pawar : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. गावागावांत रोजगार हमीची कामे सुरू करून दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी आठवले यांनी केली.

रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिकुटुंब एक लाख रुपये, तर शेतमजूर, कामगार आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

यावेळी अण्णासाहेब रोकडे, मिलिंद शेळके, ॲड. ब्रह्मानंद चव्हाण, सिद्धार्थ कासारे, सचिन मोहिते, राजू जोगदंड यांच्यासह रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन ॲड. सुरेश वडमारे आणि प्रा. बाळासाहेब गव्हाणे यांनी केले.

Marathwada Drought Crisis
Chhatrapati Sambhajinagar news: धक्कादायक! प्रेमविवाहानंतर पतीनेच पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ नातेवाइकांना पाठवले

सुप्रिया सुळेंच्या जावयला द्यायला जमीन मग गोरगरिबांचे काय : पप्पू कागदे

सुप्रिया सुळे यांच्या जावयाला हजारो एकर गायरान जमीन भाडेतत्त्वावर देण्याची तयारी दाखवली जाते; मग वंचित, गोरगरीब आणि मागास समाजातील लोकांना जमीन देताना सरकार मागे-पुढे का पाहते, असा सवाल रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news