Rakesh Gidde death case : तहसीलदार राकेश गिड्डे मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी

विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना व एसपींना निर्देश
Rakesh Gidde death case
राकेश गिड्डेpudhari photo
Published on
Updated on

बीड : केज येथील दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय व्यक्त होत असताना या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी अंबाजोगाईलातूर मार्गावर रेणापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात तहसीलदार गिड्डे यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात म्हणून नोंदविण्यात आले असले तरी या घटनेमागे काही संशयास्पद बाबी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे आली होती.

Rakesh Gidde death case
Sindhudurg News : वायंगणीतील महिलांची मालवण पोलिस ठाण्यावर धडक

नॅशनल ह्युमन राइट्स अँड क्राइम कंट्रोल ऑर्गनायझेशन व वुमन अँड चाइल्ड सेक्युरिटी वेल्फेअर फाउंडेशनच्या महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रिया रामेश्वर झांबरे यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सीआयडी चौकशीचे आदेश दिले.

आपल्या पत्रात त्यांनी घटनेच्या दिवशी तहसीलदार गिड्डे कोणाच्या संपर्कात होते, त्यांच्या हालचाली काय होत्या, तसेच अपघात घडण्यामागील सर्व बाबींची सखोल चौकशी करून स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, यामागील सत्य उघड करण्यासाठी सीआयडीमार्फत तपास करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

Rakesh Gidde death case
Jalgaon Crime News | लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणाऱ्या 'पप्पू'च्या मुसक्या आवळल्या; 4 लाखांची कार जप्त

दरम्यान, या निर्णयामुळे गिड्डे यांच्या मृत्यूबाबत असलेल्या संशयाच्या छायेला उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, निष्पक्ष चौकशीतून सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news