आम्ला शिवारात अफू लागवडीवर छापा

८० किलो अफू जप्त; तलवाडा पोलिसांची कारवाई
beed news
आम्ला शिवारात अफू लागवडीवर छापाfile photo
Published on
Updated on

Raid on opium cultivation in Amla Shivara

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील आमला गाव शिव-ारात बेकायदेशीररीत्या अफू पिकाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून तलवाडा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल ८० किलो अफू जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे २० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

beed news
Theft Case : लाखभर रुपयांच्या दुचाकीचे मिळायचे दहा हजार

मिळालेल्या माहितीनुसार, आम्ला शिवारातील गट क्रमांक २१३ मधील शेतात अफू पिकाची बेकायदेशीर लागवड करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना बातमीदारामार्फत मिळाली होती.

त्यानंतर तलवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी वरिष्ठांना माहिती देत गेवराई येथील न्यायवैद्यक तपासणी पथकाला बोलावून कारवाईचे नियोजन केले. ४ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकला.

beed news
दरोडा टाकणाऱ्या टोळीला बेड्या

या कारवाईदरम्यान शेतात अफू पिकाची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ ८० किलो अफू जप्त करून सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कैलास अन्नालादास यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर कदम (वय ४०, रा. आम्ला) याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत तलवाडा पोलिस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी हे करीत आहेत. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अमली पदार्थांच्या लागवडी विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news