

Beed Robbery gang arrested
बीड, पुढारी वृत्तसेवा: पाटोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येवलवाडी परिसरातील पवनचक्कीमधील केवल व साहित्य चोरून नेल्याची घटना दि. २५ फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने करत यातील तिघा दरोडेखोरांना अटक केली असून दोघे फरार आहेत.
पाटोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या येवलवाडी परिसरात उभा करण्यात आलेल्या पवनचक्कीला वॉचमन म्हणून काम करणारे सौरभयेवले व शुभम सोंडगे यांना २५ फे ब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता चोरट्यांनी मारहाण करत पवनचक्कीमधील केबल व साहित्य चोरून नेले होते.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी करत होते. त्यांना सदरचा गुन्हा हा वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथील मधुकर आबा काळे, बबलु शिंदे व त्यांच्या साथीदारांनी केल्याची व ते सध्या खामरकवाडी शिवारातील एका फटाक्याच्या कारखान्यावर काम करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी साथीदार अनिल काळे, शिवाजी शिंदे, अमोल शिंदे यांच्यासह मिळून केल्याचे समोर आले. यातील दोघांना अटक करण्यात आले असून इतर तिघे फरार आहेत. यातील केबल विक्री करून मिळालेले वीस हजार रुपयेदेखील पोलिसांनी जप्त केले असून अधिक तपास पाटोदा पोलिस करत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनित कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलिस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे, सोमनाथ गायकवाड, मारुती कांबळे, राहुल शिंदे, बाळू सानप, आनंद मस्के, अर्जुन यादव, अशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, वडमारे, हराळे, मांजरे यांनी केली.