Theft Case : लाखभर रुपयांच्या दुचाकीचे मिळायचे दहा हजार

चोरटा अन् मध्यस्थ उपाशी; पार्ट विक्री करणारा भंगारवाला तुपाशी !
Theft Case
Theft Case : लाखभर रुपयांच्या दुचाकीचे मिळायचे दहा हजारfile photo
Published on
Updated on

Ten thousand rupees for a two-wheeler worth one lakh rupees theft case

उदय नागरगोजे

बीड : यापूर्वी दुचाकी चोरी झाल्यानंतर ती कधीतरी कोणाकडे तरी मिळून यायची, पण गत काही दिवसांत एकदा चोरी झालेली दुचाकी पुन्हा कुठे मिळूनच येत नव्हती, गेवराई पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी सर्व गुन्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर ही बाब लक्षात येत होती, पण त्याच दिशेने त्यांनी तपास सुरू केल्यानंतर समोर आली ती दुचाकी चोर ते भंगारवाला यांची साखळी.

Theft Case
Beed Crime News | केज शहरातून दोन महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता

यात सरासरी लाखभर रुपये किंमत असलेली दुचाकी चोरल्यानंतर चोरट्याला अवघे सहा हजार मिळायचे, मध्यस्थाला चार हजारांत समाधान मानावे लागायचे तर या दुचाकीचे पार्ट विकून आणि चेसीस भंगारमध्ये टाकून भंगारवाला मालामाल होत असल्याचे तपासातून समोर आले.

गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी पदभार स्विकारल्यापासून दुचाकीचोरीच्या घटनांच्या तपासावर लक्ष केंद्रित केले होते. यामध्ये यापूर्वी वर्षभरात चोरी गेलेल्या सोळा दुचाकींपैकी केवळ तीन दुचाकींचा शोध लागू शकला होता. उर्वरित दुचाकी मात्र कुठेच आढळून येत नव्हत्या. नेमकी हीच बाब पवार यांनी हेरली आणि चोरट्यांनी काहीतरी वेगळा पॅटर्न शोधून काढल्याची शंका त्यांनी आली.

Theft Case
Beed Bike Theft : दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

यादरम्यानच गेवराई शहरात दोन महिन्यांपासून घडलेल्या दुचाकीचोरीच्या घटनांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, शहरातील एन्ट्री पॉइंटवरील सीसीटीव्ही याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर संभाजीनगरातील दुचाकी मेकॅनिक सय्यद अब्रार याच्यावर त्यांना संशय आला. त्याची माहिती घेत त्याच्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून गेवराई पोलिस लक्ष ठेवून होते.

यानंतर तो दुचाकी चोरल्यानंतर कोणाला भेटतो, तेथून दुचाकी कुठे नेली जाते, ही सर्व माहिती हाती येताच सय्यद अब्रार याला उचलले, त्यानंतर बीडमधील मध्यस्थ सय्यद इमदाद व त्यानंतर भंगार व्यापारी शेख आसेम याला देखील अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर समोर आले ते पोलिस अधिकऱ्यांनाही चक्रावून टाकणारे होते.

सय्यद अनार याने चोरलेल्या दुचाकींचे अवघ्या दोन तासांत भंगारमध्ये रुपांतर करण्याची कला शेख आसेम याला होती. या गाड्यांचे महत्त्वाचे पार्ट स्वस्तामध्ये गरजू दुचाकीचालकांना विकायचे, त्यातूनही पैसे कमवायचे, चेसीस भंगारमध्ये विकून त्यातूनही पैसे कमवायचे उद्योग सय्यद अब्रार करत होता. ही साख-ळीच गेवराई पोलिसांनी अतिशय कौशल्याने समोर आणत या चोरट्यांना गजाआड केले आहे.

किशोर पवार यांच्यासह टीमची कामगिरी

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत बहुतांश कारवाई या स्थानिक गुन्हे शाखेकडून केल्या जात असल्याचे दिसते. परंतु गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी मात्र अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून या टोळीचा पर्दाफाश केल्याने या टीमचे कौतुक केले जात आहे.

आणखी गुन्हे येणार उघडकीस

बीडमध्ये जास्त अॅक्टीव्ह असणारी दुचाकीचोरट्यांची ही टोळी गेवराई पोलिसांनी पकडल्यानंतर आता त्यांच्या अधिक चौकशीत इतर गुन्हेही उघडकीस येणार आहेत. शेख आसेम याच्याकडून जप्त केलेल्या चेसीस, इंजिन हे नेमके किती दिवसांपासून ठेवलेले होते. यापूर्वी त्यांनी किती दुचाकींच्या चेसीस विकल्या, पार्ट नेमके कोठे विक्री केले जायचे, या साखळीत आणखी कोणी आहे का? याचा तपास गेवराई पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news