FDA : गायी-म्हशींच्या किमती २० ते ३० हजारांनी वाढल्या !

राज्यातील बहुतांश बाजारात पशुधन खरेदीकडे कल, दूध विक्रीतून लाभाची अपेक्षा
FDA
FDA : गायी-म्हशींच्या किमती २० ते ३० हजारांनी वाढल्या !file photo
Published on
Updated on

Prices of cows and buffaloes have risen by 20,000 to 30,000!

उदय नागरगोजे

बीड : मी गेल्या अनेक वर्षांपासून म्हैस खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. गेल्या काही दिवसांत दूध भेसळीच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे बाजारात जनावरांना मागणी वाढली आहे. विशेषतः गायी, म्हशींच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. आम्ही कोपरगाव, घोडेगाव, हिरापूर, नेकनूर, गंगाखेडसह इतर बाजारांत म्हशी विक्रीसाठी घेऊन जातो, आज मी दहा म्हशी घेऊन आलो होतो, पैकी पाच विकल्या आहेत... मुंडेंनी सुरू केलेल्या कारवाईमुळे हे सगळं होतंय अशा शब्दात व्यापारी गोविंद माळी यांनी आपल्या भावना मांडल्या.

FDA
Beed Crime : गुप्तधनाचे आमिष दाखवून तीन लाख रुपयांची फसवणूक

गेल्या दोन महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. विशेषतः दूध संकलन केंद्र, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती केंद्र या ठिकाणी तपासणी केली जात आहे. खवा, पेढा, पनीर यासारख्या पदार्थांमध्ये होत असलेली भेसळ थांबवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. अगदी डेअरी प्लान्ट चालकांच्या बैठकादेखील या विभागाच्या वतीने घेण्यात आल्या आहेत.

यामुळे दूध भेसळीचा गोरखधंदा करणाऱ्यांमध्ये देखील भीती निर्माण झाली आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे शेतकरी-पशुपालक मात्र सुखावला आहे. त्याच्याकडच्या दुधाला आता 'अच्छे दिन' आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. परिणामी दुधाळ जनावरांच्या बाजारातील किमतीमध्येही मोठे फेरबदल झाल्याचे पहायला मिळत आहे.

FDA
Share Market Fraud | ४०० कोटींचा 'सिस्पे इन्फिनिटी' घोटाळा: मुख्य सूत्रधार राहुल काळोखेचे फिजीमधून भारतात प्रत्यार्पण, ११४ कोटींची मालमत्ता जप्त!

चांगले दूध देणाऱ्या म्हशींच्या किमती लाखभर रुपयांवरून एक लाख तीस ते चाळीस हजारांपर्यंत पोहचल्या आहेत. प्रत्येक बाजारात पशुपालकांकडून गायी-म्हशींना मागणी वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे व्यापारी गोविंद माळी यांनी सांगितले. गोविंद माळी हे अनेक वर्षांपासून म्हशींचा व्यापार करतात. अगदी कोपरगाव, घोडेगावपासून ते परभणीतील गंगाखेडपर्यंतच्या बाजारात ते दर आठवड्याला जातात.

गेल्या काही दिवसांत झालेले बदल त्यांनी सांगितले. मुंडे यांनी सुरू केलेल्या कारवाईनंतर जे शेतकरी एकदोन म्हशी सांभाळत होते, ते आणखी म्हैस खरेदी करण्यासाठी बाजारात दाखल होत असल्याचे पहायला मिळाले. गायींच्या किमतीदेखील गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वाढल्या आहेत. जर्सी गाय साधारणतः साठ ते सत्तर हजारांपर्यंत मिळायची, ती आता लाखभर रुपयांपर्यंत पोचहली आहे. याबरोबरच मुर्रा आणि जाफराबादी यांच्या किमती 1 लाख 60 ते 70 हजारांपर्यंत पोहचल्या आहेत. यापूर्वी कधीच एवढा भाव नव्हता असे नेकनूर येथील व्यापारी संतोष नन्नावरे यांनी सांगितले-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news