

Police administration holds meeting with coaching class directors
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा: सध्या कोचींग क्लासेस, स्पर्धा परिक्षा अभ्यासिका केंद्र, मुला-मुलींचे वस्तीगृह मध्ये व परिसरामध्ये मुलींच्या छेडछाडीच्या व अत्याचाराचा घटना घडत आहेत. तशा घटना अंबाजोगाई शहरात घडु नयेत यासाठी पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहरच्या वतीने शनिवारी अंबाजोगाई शहरातील कोचींग क्लासेस, स्पर्धा परिक्षा अभ्यासिका केंद्र, मुला-मुलींचे वस्तीगृह यांच्या संचालकांची बैठक घेण्यात आली.
बैठकीत मुला-मुलींचे सुरक्षेच्या अनुषंगाने क्लासेस, अभ्यासिक केंद्र, वस्तीगृहामध्ये व परिसरात उउढत कॅमेरे बसवणे, तक्रार पेटी बसवणे व तक्रार रजिस्टर ठेवणे. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक नेमवा. पार्कीगची व्यवस्था करावी, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तयार करावे.
वय १८ पेक्षा कमी अस-लेले मुला-मुलींना मोटार सायकल, स्कुटी घेवुन येवु न देने या बाबत त्यांचे पालकांन सुचना द्याव्यात तसेच मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य त्या उपययोजना करणे बाबत योग्य सुचना दिल्या आहेत. या बैठकीस एकुण ४५ क्लासेस, स्पर्धा परिक्षा अभ्यासिका केंद्र, वस्तीगृह यांचे संचालक यांच्यासह पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सपोनि कांबळे, पोह संतोष बदने हजर होते.