

57 criminals caught, four absconding accused arrested
परभणी, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पोलिस विभागाने मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यात एकाच रात्रीत तब्बल ५७ गुन्हेगारांना अटक करण्यात आली तर ४ फरारी आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले. तसेच न्यायालयीन १२९ वॉरंट्स बजावले असून १८३ समन्सही बजावल्या.
सदर कारवाई दि.४ जुलैच्या रात्री ११ वाजेपासून ५ जुलैच्या पहाटे २ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकाच वेळी राबविली. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाण्यांनी एकत्रितपणे ही धडक मोहिम राबविली आहे. या मोहिमेंतर्गत १९ ठिकाणी नाकाबंदी करून ५५ वाहने तपासण्यात आली.
२ ड्रंक अँड ड्रायव्हिंगची प्रकरणे देखील उघडकीस आली आहेत. परभणीतील सर्व ठाणेद- ारांनी स्वतः उपस्थित राहून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. न्यायालयाच्या तारखा चुकविणारे आणि फरारी आरोपी शोधून काढण्यावर भर देण्यात आला. पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले की, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा मोहिमा नियमित राबविण्यात येणार आहेत.