Parli Municipal Council | दिल्लीत परळी नगर परिषदेचा राष्ट्रीय गौरव; केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते ‘पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान

प्रामाणिक कामासाठी प्रेरणा; हा गौरव तमाम परळीकरांचा – नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी
PM SVANidhi Samman Award 2026
नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते पुरस्कार नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनी स्वीकारलाPudhari
Published on: 
Updated on: 

PM SVANidhi Samman Award 2026

परळी वैजनाथ : पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल परळी वैजनाथ नगर परिषदेला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते हा पुरस्कार नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनी स्वीकारला.

ना. पंकजा मुंडे आणि आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी नगर परिषदेने केलेल्या कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, सचिव सतेंद्र सिंग, सहसचिव तथा व्यवस्थापकीय संचालक ईशा कालिया यांच्यासह देशभरातील बँकांचे प्रतिनिधी, विविध राज्य शासनांचे अधिकारी, पुरस्कारप्राप्त महापौर व नगराध्यक्ष आणि पथविक्रेत्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.

PM SVANidhi Samman Award 2026
Beed Parli PM SVANidhi award Maharashtra |केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून अव्वल तीन शहरांमध्ये परळीचा समावेश

या वेळी नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे, नागरी उपजीविका अभियान कक्षप्रमुख मीना नेहरकर, सतीश खेबाळे आणि नगर परिषदेच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला.

सामूहिक प्रयत्नांची राष्ट्रीय स्तरावर पोचपावती

पथविक्रेत्यांना आर्थिक आधार उपलब्ध करून देण्याबरोबरच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नगर परिषदेने प्रयत्न केले. या कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचे नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी सांगितले.

PM SVANidhi Samman Award 2026
Parli Fraud | परळीत चमत्कार दाखविण्याच्या बहाण्याने वृद्धाची अंगठी लंपास: नाशिकमधून आरोपीला अटक

ना. पंकजाताई मुंडे आणि आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहराचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून नगर परिषद काम करीत आहे. उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समन्वयातून विविध विकासकामे मार्गी लावली जात आहेत. पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांना हा पुरस्कार म्हणजे महत्त्वपूर्ण पोचपावती आहे. हा सन्मान केवळ नगर परिषदेचा नसून तमाम परळीकरांचा आहे. प्रामाणिकपणे काम करण्यासाठी हा गौरव निश्चितच प्रेरणा देणारा ठरेल,” अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.