Parli Fraud | परळीत चमत्कार दाखविण्याच्या बहाण्याने वृद्धाची अंगठी लंपास: नाशिकमधून आरोपीला अटक

अंगठी चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले
Parli Elderly Man Cheated
अंगठी चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले. Pudhari
Published on: 
Updated on: 

Parli Elderly Man Cheated

परळी वैजनाथ : दगडाच्या खड्यापासून रुद्राक्ष बनविण्याचा चमत्कार दाखविण्याच्या बहाण्याने एका वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले. अफजल नवाब मदारी (वय २५, रा. लक्कडकोट, सध्या सावरगाव, ता. येवला, जि. नाशिक) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून चोरीची अंगठी हस्तगत करण्यात आली आहे.

२८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास हेळंब (ता. परळी) येथील गणपत लक्ष्मण आंधळे हे परळी बसस्थानकात उभे होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातात दगडाचा खडा देऊन त्यापासून रुद्राक्ष बनविण्याचा चमत्कार दाखविण्याचा बहाणा केला. या दरम्यान, संबंधित व्यक्तीने आंधळे यांच्या हातातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चलाखीने काढून घेतली आणि तेथून पळ काढला. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Parli Elderly Man Cheated
Beed Crime | पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास

या गुन्ह्याचा तपास परळी शहर पोलीस आणि बीड स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतरपणे सुरू होता. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फिर्यादीने दिलेले आरोपीच्या पेहरावाचे वर्णन, सराईत गुन्हेगारांची माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात आली.

त्यानंतर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जाऊन अफजल मदारी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून अंदाजे एक लाख सात हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.

Parli Elderly Man Cheated
Beed Crime| केजमध्ये 'माझ्याशी लग्न कर!' म्हणत चारचाकी रस्त्याच्या आडवी लावून तरूणीचा विनयभंग

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस अंमलदार मारोती कांबळे, सचिन सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे, चालक अतुल हराळे आणि विकी सुरवसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news