Beed crime : परळीत SIR चे काम करणाऱ्या BLOला मारहाण

शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Voter registration SIR rules
Voter registration SIR rules
Published on
Updated on

परळी वैजनाथ : शहरातील पेठ मोहल्ला परिसरात सखोल मतदार यादी पुर्ननिरीक्षण मोहिमेच्या शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Voter registration SIR rules
Jamner Fire | जामनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला आग

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै 2026 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादी महेफूज जाकीर शेख (वय 42, व्यवसाय- शिक्षक, रा. मलिकपूरा, परळी वैजनाथ) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, 17 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता पेठ मोहल्ला परिसरातील अब्दुल हमीद शादीखाना येथे फिर्यादी हे एसआयआर (SIR) मोहिमेचे शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपींनी संगनमत करून त्यांच्या हातातील शासकीय कामकाजाची कागदपत्रे हिसकावून घेतली. तसेच शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.

Voter registration SIR rules
Jalna | आरदखेडा अवैध मुरूम उत्खनन प्रकरण : अखेर दोन वर्षांनी गुन्हा दाखल

या प्रकरणी शेख शाकेर अहमद, शेख जुनेद, शेख शोएब (सर्व रा. पेठ मोहल्ला, परळी वैजनाथ) तसेच आणखी अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 121(1), 115(2), 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा क्रमांक 190/2026 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार काळे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news