लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे ( संग्रहित छायाचित्र)
पंकजा मुंडे ( संग्रहित छायाचित्र)

बीड; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाविषयी राज्य सरकारने आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारकडे एका पत्राद्वारे केली आहे. हाके यांच्या उपोषणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी भेट देऊन त्यांचं म्हणण ऐकून घ्यावं, ही भेटही तेवढीच महत्वाची आहे, असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

ओबीसी आरक्षणाप्रश्नी प्रा. लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी वडीगोद्री येथे गेल्या सात दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. त्यांनी अन्न व पाण्याचा त्याग केलेला आहे. शासनाची भूमिका ही सर्व आंदोलनांना सारखीच असली पाहिजे. हाके यांच्या उपोषणस्थळी प्रमुख मंत्र्यांसह तुम्ही स्वत: भेट द्यावी व त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावं. ते अत्यंत संयमाने आणि सर्वांना सन्मानाने वागवत आहेत हे कौतुकास्पद आहे. त्यांचं आणि सर्व ओबीसी नेत्यांचं आवाहन देखील सकारात्मकच आहे. "कोणीही कुठल्याही प्रकारे नकारात्मक गोष्टी करू नयेत, कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये" असे आवाहन करत ते व्यवस्थेचा सन्मान करत आहेत. म्हणूनच त्यांच्याकडे तात्काळ लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे, असे पंकजा मुंडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

तसेच इथे प्रश्न समान न्यायाचा आहे. सरकारने  म्हणणे ऐकून कायद्याने निर्णय घ्यावा, अशी आवश्यकता आहे. तुम्ही व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने या आंदोलना विषयीची आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी अशी विनंती आहे, असेही मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रकात मुंडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news