

Opportunities for farmers who have turned their backs on crop insurance
बीड, पुढारी वृत्तसेवा : रब्बी हंगाम २०२५-२६ करिता प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी शेतकरी सहभाग हा अत्यल्प मिळत असल्याचे लक्षात येताच शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकर्यांना पिक विमा घेण्यसाठी जनजगृती करण्यासाठी १ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान "१० वा पीक विमा सप्ताह" तसेच संपूर्ण डिसेंबर महिन्यात नोंदणी मोहीम राबविली जात आहे. मागील पीकविम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकर्यान या योजनेकडे पाठ फिरवली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना
पीक विमा जोखीम कमी करण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी या योजनेचा प्रामुख्याने लाभशेतकऱ्यांना देण्यात येतो मात्र खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना या योजनेतून काहीच लाभ न मिळाल्याने या रब्बी हंगामासाठी शेतकरी फारसे उत्साही दिसून येत नाही, त्यामुळे शासनाने कृषी विभागास चक्क पीकविमा सप्तहाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी कामाला लावले आहे.
या सप्ताहात विमा क्षेत्राची व्याप्ती वाढवणे, शेतकऱ्यांना व्यापक जोखीम संरक्षण देणे, पीक नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना सक्षम आर्थिक आधार मिळवून देणे. याबाबत जनजागृती करण्याचे सांगितले आहे.
दरम्यान रब्बी २०२५-२६ हंगामासाठी खालील तीन पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या तीन पिकासाठी हा विमा संरक्षण असणार आहे. पीकविमा नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे.
https://pmfby.gov.in शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर हंगाम, अधिसूचित पीक व महसूल मंडळानुसार आपली माहिती नोंदवून विमा घेतला पाहिजे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे योग्यरीत्या अपलोड करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.