Beed News : धारूर घाटात लोखंडी ऐवजी सिमेंटचे कठडे उभारण्याची गरज

धारूर घाटातील धोकादायक वळणांवरील तुटलेले कठडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Beed News
Beed News : धारूर घाटात लोखंडी ऐवजी सिमेंटचे कठडे उभारण्याची गरजfile photo
Published on: 
Updated on: 

Need to install concrete barriers instead of iron ones in Dharur Ghat

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर घाटातील धोकादायक वळणांवरील तुटलेले कठडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. घाटाच्या दुरुस्ती व सुरक्षेसाठी मंजूर झालेल्या ७० लाख रुपयांच्या निधीतून सध्या कठड्यांचे काम सुरू असले, तरी खोल दरीलगतच्या धोकादायक ठिकाणी मजबूत सिमेंट काँक्रीटची तटबंदी उभारण्याऐवजी लोखंडी अँगल व पाइपच्या आधारे कठडे उभारले जात असल्याने या कामाच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Beed News
Beed News : शंभर टक्के दरवाढीसाठी ऊसतोड मजुरांचा संप

धारूर घाट हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असून, घाटातील अनेक वळणांवर अपघातांमुळे कठडे तुटलेले आहेत. रस्त्याच्या कडेला खोल दरी आणि तुटलेले कठडे यामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग कायम धोकादायक ठरत आहे. यापूर्वी कठडे तुटलेल्या ठिकाणांवरून ट्रक, टेम्पो यांसह अनेक वाहने दरीत कोसळल्याच्या घटना घडल्या असून, त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे

या पार्श्वभूमीवर घाटातील सुरक्षेच्या कामासाठी काही महिन्यांपूर्वी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून सध्या विविध कामांना सुरुवात झाली असून, काही ठिकाणी नवीन कठडे उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी कठडे तुटले आहेत आणि रस्त्यालगत खोल दरी आहे, अशा ठिकाणीही लोखंडी पाइप व अँगलच्या आधारे कठडे उभारले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एखादे अवजड वाहन कठड्यावर आदळल्यास हे कठडे त्याचा कितपत प्रतिकार करू शकतील, असा सवाल उपस्थित होत आहे.

Beed News
Crop Insurance Process : एकाच कापसाचे तीन काट्यांवर वेगवेगळे वजन

धोकादायक ठिकाणांचे फेरसर्वेक्षण करा

रस्ते विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून घाटातील धोकादायक ठिकाणांचे फेरसर्वेक्षण करावे, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे. विशेषतः खोल दरीलगतची वळणे, अपघातप्रवण ठिकाणे आणि यापूर्वी कठडे तुटलेल्या भागात केवळ लोखंडी कठडे उभारण्याऐवजी गरजेनुसार मजबूत सिमेंट काँक्रीटची तटबंदी उभारावी, अशी मागणी आहे. सार्वजनिक निधी खर्च करताना केवळ काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट न ठेवता प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन कामाचा दर्जा व भविष्यातील टिकाऊपणा सुनिश्चित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news