Nanded rain news: आभाळ फाटलं अन् घास रानातच हरपला; शेतकऱ्यांची अवस्था बिकट

Maharashtra farmers crisis: 100 टक्के पिक विमा मंजूर व्हावा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी; हवालदिल शेतकऱ्यांची मागणी, सत्ताधारी-विरोधकांनी पाठपुरावा करण्याची गरज
Nanded rain news
Nanded rain news
Published on
Updated on

नरेंद्र येरावार

उमरी: काय करावं देवा. कुणाला सांगावं. जो तो येतो फोटो काढतो. मात्र मदत कोणीच देत नाही. "आभाळ फाटलं.... पिकांचा चिखल झाला, अन् शेतकऱ्यांचा घास रानातच हरपला" अशी बिकट अवस्था कृषीप्रधान असलेल्या देशातील शेतकऱ्यांची झाली आहे.

Nanded rain news
Nanded Rain : विष्णुपुरीतून तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरुच, नांदेड जिल्ह्यातील अनेक गावे अद्याप पाण्याखालीच

उमरी शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शुक्रवारी (दि.२६) संततधार आणि शनिवारी (दि.२७) मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साचले. हाताला आलेले मूग गेले.. उडीद गेले.. सोयाबीन गेले..कापूस गेला..काही ठिकाणच्या जमिनीही वाहून गेल्या.

Nanded rain news
Nanded Rain : नांदेडमध्ये 'गोदावरी'चे पात्र फुगले; नदीकाठच्या भागांत पाणी पसरले !

गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे शेतकऱ्यांची दैना झाली. महागाईचे बियाणे शेतात टाकले. रसायनिक खते टाकली. यंदा उत्पन्न वाढेल. चार पैसे हातात येतील. अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकदा निराशा आली. काय करावे कळत नाही देव कोपला. पिके गेली. अनेकांची जनावरे वाहून गेली. अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या बळीराजाला शासकीय मदतीची गरज आहे. शंभर टक्के पिक विमा मंजूर व्हावा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी. यासाठी शासन दरबारी सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

Nanded rain news
Nanded Rain : कंबरेइतक्या पाण्यातून जाऊन आ. आनंदराव बोंढारकर यांनी केली पूरग्रस्त शेतीची पाहणी !

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने कहरच

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने कहरच केला आणि शेतातील सर्वच वाहून नेले. शनिवारी (दि.२७ सप्टें) देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. गोदावरी नदीला महापूर आला. ग्रामीण भागात जाणाऱ्या अब्दुलापूरवाडी, हातनी, बेलदरा, येंडाळा, महाटी, कौडगाव, कुदळा, बोळसा, ईज्जतगाव जाणाऱ्या रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दिवसभरासाठी वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे अनेकांनी उमरी शहरात येण्याऐवजी घरातच बसणे पसंद केले. शनिवारी सकाळपासून सूर्यदर्शन झालेलेच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news