

Murder of Female Home Guard Death over a love triangle?
बीड, पुढारी वृत्तसेवा
बेपत्ता असलेल्या महिला होमगार्डचा मृतदेह गुरुवारी ओढ्यात आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेकडे चौकशी केली असून हा प्रकार लव्ह ट्रॅगलमधून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अयोध्या राहुल व्हरकटे (वय-२६) असे मयत महिलेचे नाव आहे. अयोध्या गेवराईला होमगार्ड होत्या.
दोन दिवसांपासून त्या बेपत्ता झाल्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा देखील नोंदविण्यात आला. गुरुवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलिसांना यात सदर महिलेचा मृतदेह बीड तालुक्यातील पांगरीजवळ असलेल्या एका मोठ्या नाल्यात आढळून आला.
सदर घटना पाहता घातपाताची शक्यता असून प्रेम प्रकरणामुळे ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. रात्री उशिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सायंकाळी उशिरा मृतदेह शवविच्छेदानासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. शिव- ाजीनगर पोलिसांनी याप्रकरणात एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तिच्याकडे अधिक चौकशी केली जात असून ज्या बॉक्समधून अयोध्याचा मृतदेह आणला गेला, तो देखील मिळून आला आहे.