

OBC leader Laxman Hake criticizes Jarange Patil
बीड, पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे यांचा आर क्षणापेक्षा पॉलिटीकल अजेंडा मोठा आहे. हे त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. आताही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईला निघाले आहेत. मुंबईत दंगल घडू शकते, अशी भीती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे गुरुवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हाके म्हणाले की, एकेका ओबीसी नेत्याला टार्गेट करून संपवले जात आहे, ओबीसींचे आरक्षण संपल्यात जमा आहे, परंतु अशा स्थितीत कोणी विचारवंत, साहित्यिक बोलायला तयार नाहीत.
मुख्यमंत्री असू देत किंवा प्रमुख राजकीय पक्ष, ओबीसी नेते, इतर मंत्री, लोकप्रतिनिधी ओबीसींच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. गेले दोन वर्ष महाराष्ट्र आरक्षण प्रश्नावरुन जळत असतांना गप्प बसलेले शरद पवार आता मंडल यात्रा काढत आहेत, त्यांना अशी यात्रा काढण्याचा कोणताही अधिकार नाही. एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागणाऱ्या जररांगेंना रसद पुरवायची अन् दुसरीकडे मंडल यात्रा काढायची असे दुटप्पी धोरण शरद पवार राबवत आहेत.