

Munde sister and brother in the district for the municipal council elections
उदय नागरगोजे
बीड : बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता राजकीय घडामोडींना वेग आला असून वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांची यादी जवळपास नक्की केली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचा बुधवारी दिवसभर बीडमध्ये तळ होता तर आ. धनंजय मुंडे यांनी परळीत बैठका घेत आढावा घेतला. याबरोबरच माजलगाव, अंबाजोगाई, धारूर, बीड, गेवराई या ठिकाणचे स्थानिक नेते डावपेच आखण्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहेत.
बीड जिल्ह्यातील बीडसह माजलगाव, परळी, धारूर, माजलगाव व अंबाजोगाई या नगरपालिकांच्या निवडणुका आठ वर्षानंतर होत आहेत. गतवेळच्या निवडणूकानंतर बराच कालावधी लोटला असल्याने अनेक ठिकाणची राजकीय समीकरणे बदलली आहेत. यातच पक्षातील नाराजांना बंडखोरीची संधी मिळणार नाही, याकरिता वरिष्ठ नेते उमेदवारी जाहीर करण्याचे टाळत असल्याचे दिसते. अंतिम एकदोन दिवसातच उमेदवार नक्की केले जातील असे राजकीय जाणकार सांगत आहेत. तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार देखील ठरवण्यात आले असले तरी त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. परंतु ण्यांची नावे अंतिम झाली, ते तयारीला लागल्याचे दिसते. बीडमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागरबीड नगरपालिकेवर गेल्या पस्तीस वर्षांपासून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे वर्चस्व राहिलेले आहे.
यावेळच्या निवडणूकीची सुत्र त्यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हाती असल्याचे पहायला मिळते. तर त्यांच्यासमोर त्यांचेच चुलतभाऊ आ. संदिप क्षीरसागर यांनी आव्हान निर्माण केले आहे. बीड शहरातील कोणत्या प्रभागात कोण प्रभावी उमेदवार ठरु शकतो, याची गणिते या दोन्ही भावांना चांगल्या पद्धतीने माहीत असल्याने उमेदवार निवडतांना वेगवे गळे निकष लावले जात आहेत. एकेका वॉर्डमध्ये दोन दोन पर्याय ठेवण्यात आले असून या दोघांपैकी एकाला संधी मिळणार आहे तर दुसऱ्याची नाराजी दूर करण्याची कसोटीही क्षीरसागर बंधुंना करावी लागणार आहे. यातच बीडचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असल्याने दावेदारही मोठ्या प्रमाणात आहेत. यातील जनमाणसात स्थान असलेल्या उमेदवाराला संधी देण्याचे निश्चित करण्यात आले असले तरी वरिष्ठ ऐनवेळी कार्य निर्णय घेतात, याबाबत अंदाज बांधले जात आहेत.
गेवराई नगरपालिकेसाठी परंपरागत पंडित विरुद्ध पवार अशीच लढत पहायला मिळत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शितल दाभाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर दुसरीकडे भाजपाकडून गीता पवार यांचे नाव निश्चित आहे. या निवडणुकीत विद्यमान आमदार विजयसिंह पंडित व माजी आ. लक्ष्मण पवार यांचे बंधु बाळराजे पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याबरोबरच माजी मंत्री बदामराव पंडित यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपात प्रवेश केला असून यामुळे भाजपाचे बळ वाढले आहे. तर माजी आमदार अमरसिंह पंडित हे देखील या निवडणूकीत सक्रीय झाल्याने मेवराईत प्रच- ाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रकाश सोळंके विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मोहनराव जगताप यांनी डावपेच सुरु केले आहेत. यातही या ठिकाणी भाजपाची भूमिका महत्त्वाची असून यावेळी भाजपाचा उमेदवारही मैदानात उतरणार आहे. यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.
हजारींच्या जोडीला निर्मळ यांची ताकद
धारुर नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा वर्चस्व राखण्यासाठी डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी तयारी केली आहे. त्यांच्या जोडीला माधव निर्मळ यांची ताकद आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. प्रकाश सोळंके, जयसिंह सोळंके यांच्या नेतृत्वाखाली नितीन शिनगारे या निवडणूकीच्या रणधुमाळीत उतरले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडूनही जोरदार तयारी सुरू असल्याने धारुरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
अंबाजोगाईत पुन्हा एकदा मोदी विरुद्ध मुंदडा
अंबाजोगाई नगरपालिकेत यावेळीही मोदी विरुद्ध मुंदडा अशीच लढत पहायला मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही नगरपालिका राजकिशोर मोदी यांच्या ताब्यात राहिलेली आहे. ती खेचून आणण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांच्यासह नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांची भूमिकाही निर्णायक असणार आहे. अशा स्थितीत मतदार यावेळी कोणाला कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
परळीत मुंडे बहीण-भावाची युती होणार?
अंबाजोगाई नगरपालिकेत यावेळीही मोदी विरुद्ध मुंदडा अशीच लढत पहायला मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही नगरपालिका राजकिशोर मोदी यांच्या ताब्यात राहिलेली आहे. ती खेचून आणण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांच्यासह नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांची भूमिकाही निर्णायक असणार आहे. अशा स्थितीत मतदार यावेळी कोणाला कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.