Beed Political News : अजितदादा धनंजय मुंडेच्या पाठिशी, बीड जिल्ह्यात भाऊंनाच बळ; 'राष्ट्रवादी'त मिळणार महत्त्वाची जबाबदारी

प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात मुंडेंना बळ; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
Ajit Pawar Dhananjay Munde NCP Beed
Ajit Pawar Dhananjay Munde NCP Maharashtra PoliticsPudhari
Published on
Updated on

MLA Dhananjay Munde NCP Ajit Pawar Beed Politics

बीड, पुढारी वृत्तसेवा : आ.धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच महत्वाची भूमिका राहिलेली आहे. एनडीए सोबत येत असताना आ. मुंडेंनी महत्त्वाची भूमिका बजावली, परळी मतदारसंघातून ते विक्रमी मतांनी निवडून आले. यापुढेही त्यांची भूमिका महत्त्वाचीच असेल असे सांगत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातून मुंडेंना बळच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Ajit Pawar Dhananjay Munde NCP Beed
Dhananjay Munde : वैर माझ्याशी होते, जिल्ह्याची बदनामी का केली?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार नवपर्वाचा या मेळाव्यानिमित्त रविवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, आ. विक्रम काळे, आ. विजयसिंह पंडित, माजी आ. बाळसाहेब आजबे, कल्याण आखाडे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, डॉ. योगेश क्षीरसागर, अमर नाईकवाडे, फारुक पटेल, यांच्यासह विविध सेलच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मेळावा झाला. मेळाव्यापुर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विविध नेते, कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेटी देत समतोल साधण्याचा प्रयत्न केला.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात महायुतीला स्विकाराव्या लागलेल्या पराभवापासून केली. बीडमध्ये पंकजा मुंडे या सक्षम उमेदवार होत्या, परंतु काही अपप्रचार करण्यात आला आणि त्यांचा निसटता पराभव झाला. अशाच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात देखील महायुतीला अपेक्षित असे यश मिळवता आले नाही. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीने मोठे यश मिळवले. याला महायुतीचे सर्वसमावेशक धोरण कारणीभूत होते. तसेच लाडकी बहीण योजनाही प्रभावी ठरली. ही योजना राचवली जात असतांना विरोधकांनी आवई उठवली की राज्य कर्जबाजारी होईल, पण असे काही झाले नाही.

Ajit Pawar Dhananjay Munde NCP Beed
Beed News : युवकाच्या खूनप्रकरणी तिघांना बेड्या, एकास पाच दिवसांची पोलिस कोठडी

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिशय योग्य नियोजन करत ही योजना आजही सुरु ठेवली आहे. भविष्यात देखील लाडक्या बहीणीसाठीची ही योजना सुरुच राहणार आहे असे तटकरे यांनी सांगितले. बीड जिल्हा हा राजकीयदृष्ट्या सर्वात सजग जिल्हा असल्याचे सांगत सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादीमधील महत्व अध रेिखित केले. राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोवत येत असतांना धनंजय मुंडे यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यापूर्वी आणि आता देखील ते पक्षासाठी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत आणि भविष्यात देखील राहणार असल्याचे ठामपणे सांगत पक्ष मुंडेंच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, आपण पुन्हा एकदा बीडचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्या मतदारसंघातून किती लोक ?

यावेळी तटकरे यांना बीडमधील राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीची कुणकुण लागल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवत होते. या मेळाव्याकरिता कोणत्या मतदारसंघातून किती लोक आले आहेत? हे विचारु शकतो, पण मी विचारणार नाही, कारण मला कार्यकर्त्यांना सोबत घेवून पुढे चालायचे आहे असे सांगितले.

आ. सोळंके, आ. पंडित यांच्या फोटोवरुन चर्चा

मेळाव्यात भाषण करतांना सुनिल तटकरे यांनी बॅनरवर आ. प्रकाश सोळंके तसेच आ. विजयसिंह पंडित यांचे मोठे फोटो नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यापुढे लावल्या जाणाऱ्या प्रत्येक बॅनरवर या दोन्ही आमदारांचे मोठे फोटो असायला हवेत असे पदाधिकाऱ्यांना सांगत या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news